Breaking News

औरंगाबादचे बसस्थानक कात टाकणार...उभारणार ३ मजली भव्य कमर्शियल कॉम्पलेक्स

मराठवाड्यातील मॉडेल बसस्थानक म्हणून नावारूपाला आलेले औरंगाबादचे मध्यमवर्ती बसस्थानक आता कात टाकणार आहे. या बसस्थानकाचे आता भव्य ३ मजली कमर्शियल वास्तूत रूपांतर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. या संपुर्ण कायापलटासाठी रू.३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे आणि या कामासाठी आता टेंडर मागविण्यात येणार आहेत. हे कमर्शियल कॉम्पलेक्स भाडेतत्वावर चालविण्यास देण्याचा मंडळाचा मानस आहे.
औरंगाबादच्या स्थानकाच्या सोबतच नाशिक, कराड, अकोला, रत्नागिरी, पनवेल अशा इतर ६ स्थानकांचाही कायापलट होणार आहे. औरंगाबाद स्थानकाची सध्याची इमारत पाडण्याचे काम काही महिन्यात सुरू होणार आहे. या जुन्या इमारतीच्या जागेवर ३ मजी इमारत उभी राहणार आहे. या इमारतीमध्ये पुढीलप्रमाणे सोयी असणार आहे. पहिल्या मजल्यावरील जागा महामंडळाला दिली जाणार आहे यात रेस्ट रूम, रेस्टॉरंट इत्यादी सोयींचा समावेश असणार आहे. जुन्या स्थानकापेक्षा जास्त फलाट येथे उभारण्यात येणार आहे. प्रवाशांच्या कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी यात घेण्यात येणार आहे. बाकीचे २ मजले हे भाडेतत्वार कंत्राटदाराला चालविण्यात देण्यात येणार आहे. सदरील इमारत ही ४ वर्षात तयार करण्यात येणार असून याचे टेंडर दिनांक २७ ऑक्टोबर २०१२ रोजी काढण्यात येतील.

No comments