Breaking News

Search This Blog

औरंगाबादचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे शिवसेनेत पुनरागमन

औरंगाबाचे अपक्ष आमदार मा.श्री.प्रदीप जैस्वाल यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. जैस्वाल यांनी आज मातोश्री वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपल शिवसेनेत पुर्नप्रवेश जाहिर केला. जैस्वाल यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय झाला होता. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून कामं होत नसल्यामुळे ते स्वगृही परतले होते. काही दिवसांपुर्वीच जैस्वाल यांनी शिवसेनेत आपण परतणार असल्याचे संकेत दिलेले होते. परंतु आजच्या शिवसेनाप्रमुखांच्या भेटीमुळे याला पुर्णविराम मिळालेला आहे. याप्रसंगी औरंगाबाचे खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाध्यक्ष आंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेनत पुरागमन केल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

No comments