Breaking News

औरंगाबाद ऑटोक्लस्टर चे उद्‌घाटन ३१ ऑगस्ट रोजी होणार, औरंगाबादच्या वैभवात मानाचा आणखी एक तुरा

औरंगाबादेत बजाज, व्हेरॉक, स्कोडा, बडवे इंजिनिअरींग, संजीव ऍटो पार्ट आदी कंपन्यामुळे आता औरंगाबाद खर्‍या अर्थाने ऍटो हब झाले आहे. औरंगाबादेत अनेक लहान मोठ्या कंपन्या आहेत ज्या वाहन निर्मिती करणार्‍या कंपन्यांना स्पेअर पार्ट (सुटे भाग) पुरवतात. अशा व्हेंडरची एक मोठी साखळीच औरंगाबादेत तयार झाली आहे. कंपन्यांची परदेशातील गुंतवणुकही मोठी असल्यामुळे राज्याच्या अर्थकारणात याचा मोठा फायदा होत आहे.  या स्पर्धेत टिकाव धरून ठेवण्यासाठी लघु व मध्यम उोगांना वाहनाचा एखादा स्पेअर पार्ट डिझाईन करण्यासाठी मुंबई व पुणे सारख्या शहराकडे धाव घ्यावी लागत होती वेळ आणि पैसा अश्या दोन्ही गोष्टींचा अपव्यय यामुळे होत होता. दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी मध्यम व लघु प्रकल्प फार गुंतवणुक करू शकत नाही.

ऍटोमोबाईल क्षेत्रातील हीच अडचण लक्षात घेवुन औरंगाबादेत ऍटोक्लस्टर उभारावे ही उोजकांची इच्छा होती जेणे करून मध्यम व लघु प्रकल्पांना याचा फार मोठा फायदा होईल. यासाठी सीएमआय ने मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करवून घेतला. आणि वाळूज वसाहतीत ५६ हजार चौ.फुट भुखंडावर हा प्रकल्प उभा झाला आहे. याचा १ ला टप्पा पुर्ण झाला असून यात लॅब, रॉ मटेरिअल बँक, इंजिनिअरींग लायब्ररी, लेझर कटींग फॅसेलिटी, डिसप्ले सेंटर इ. अयावत सुविधा उपलब्ध आहेत. याचे उद्‌घाटन ३१ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी ११ वाजता करणार आहेत.

No comments