Breaking News

सावधान ! टॅक्स रिफंडच्या फसव्या ई-मेलपासून सावधान !

तुम्हाला जर आयकर विभागाकडून कोणताही ई-मेल आला असेल तर सावधान व्हा. कारण अशा प्रकारचे फसवे मेल्स पाठवून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्स रिफंड परत मिळवा या नावाने हा ईमेल येतो. इन्कम टॅक्स रिफंड परत मिळवण्यासाठी तुमच्याकडून अकाऊंट डिटेल्स घेतले जातात. मात्र इथेच तुमची फसवणूक होते. कारण आयकर विभागाकडून असा कोणताही ई-मेल पाठवण्यात येत नाही, तर हा काही भामट्यांचा प्रकार आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून येणाऱ्या या मेलमध्ये तुम्हाला रिफंडची रक्कमही सांगितली जाते. शिवाय दहा दिवसात तुम्हाला रिफंड मिळेल अशीही खात्री या मेलमध्ये दिलेली असते. या ई-मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात येतं. या लिंकमध्ये रिफंड दहा दिवसात देण्याची खात्री देऊन तुमचे बँक डिटेल्स घेतले जातात. यामध्ये डेबिट कार्ड नंबर, पिन नंबर, नेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेतली जाते. या वेबसाईटवर सर्व माहिती भरुन सबमिटवर क्लिक केलं तर तुमचं बँक अकाऊंट आणि नेट बँकिंग हॅक झाली असं समजा.
 
तुमच्या नकळत अकाऊंटमधून पैसे डेबिट होतात, बहुतांश वेळेला नेट बँकिंगद्वारे पैसे डेबिट होतात. जोपर्यंत तुम्ही बँकेकडे याबाबत विचारणा करत नाही तोपर्यंत फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येत नाही. त्यामुळे टॅक्स रिफंडच्या अशा फसव्या ई-मेलपासून सावधान राहा. 

हा फसवा ई-मेल असा असतो....

Dear Valued Taxpayer,

We regret to inform you that your tax refund request was NOT successfully processed. This is due to the submission of inaccurate/incorrect account particulars.

However, after the last account audit, the total tax excesses refundable to you is now  39,910.00 INR. Please follow the reference below to re-submit a refund request and this time, endeavor to input your Information correctly to avoid further delay in the remittance of your tax refunds into your account

CLICK HERE TO SUBMIT A REFUND REQUEST

Note: Your request will be processed within TEN (10) working days.

We appreciate your sparing the time to learn about our tax refunds. It's one extra way Income tax unit can make your tax payment experience better.

Income tax unit
Ministry of finance,
lndia.

No comments