Breaking News

अग्निपथ चे श्रीगणेश वाढवणार औरंगाबाद गणेश उत्सवाची शोभा

काय ? हो...हो...हो...ही बातमी खरी आहे...अग्रिपथ या चित्रपटातील देवा श्रीगणेश हे गाणं ज्या गणपती बाप्पांच्या भव्य मूर्तीसमोर शुट करण्यात आलं तीच श्रीणेशांची मुर्ती आता औरंगाबाद गणपती उत्सवात शहराची शोभा वाढविणार आहे. संपुर्ण फायबरची ही मुर्ती कसबेकर तेल भांडारासमोर स्थापित करण्यात येणार आहे. ही संपुर्ण मुर्ती वेगवेगळ्या भागात शहरात आणून जोडण्यात आली आता विधीवत ती मुर्ती कसबेकर तेल भांडारासमोर स्थापन केली जाणार आहे. या मुर्तीला औरंगाबादला आणण्यात सुनील जैस्वाल यांनी विशेष परीश्रम घेतले आहे. जैस्वाल हे औरंगाबाद येथील कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
त्यांनी स्वतः ही मुर्ती बनविलेली आहे. अग्रिपथ या चित्रपटात यावर एक भव्य गाणेही शुट झाले आणि ते खुप गाजलेही आहे. या मुर्तीचे वैशिष्टय म्हणजे हा अष्टभुजाधारी श्रीगणेश आहे व त्याच्या प्रत्येक हातात एक एक शस्त्र आहे. सरळ सोंडेचा हा बाप्पा पुर्णाकृती आहे एकुण अंदाचे १६ फुट उंचीची ही भव्य मुर्ती आहे व बाप्पा एका पायावर कमळाच्या फुलावर उभा आहे. चला तर मंग मंडळी या बाप्पाचे जोरदार स्वागत करूया...बोला गणपती बाप्पा मोरयाऽऽऽऽऽ....

No comments