Breaking News

आता आपल्या फेसबुक,टि्‌वटरवरील अकाउंटचाही विमा उतरवा, विमा कंपनीची अनोखी शक्कल

आपल्या फेसबुक आणि व्टिटर अकाउंटचाही विमा काढणे शक्य होणार आहे. ही बातमी १००% खरी आहे. ब्रिटनच्या एका विमा कंपनीने ही अनोखी शक्कल लढविली आहे. आपले फेसबुक अथवा कोणतेही सोशल अकाउंट हॅक झाले तर त्यामुळे आपल्याला कराव्या लागणार्‍या अचणींपासून वाचण्यासाठी कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. द इन्फार्मेशन प्रायव्हसी या कंपनीने ही माहिती दिली आहे. कंपनी विशेषतः हॅकिंगमुळे झालेले बिझनेसचे नुकसान, अकाउंट हॅकिंग व आयडी चोरीच्या विरोधात अलाओ नावाचा विमा उपलब्ध करून देईल.
कंपनीचे सीईओ बेसिनी यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या विम्याची कदाचित गरज नव्हती, परंतु आता ती परीस्थिती बदलली आहे. आज इंटरनेचा वापर करणारी कुठलीही व्यक्ती सायबर गुन्ह्याची शिकार सहज होऊ शकते. त्यामुळे त्याच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचते.

असा असेल विमा : कंपनी 3.99 पाउंड (350 रुपये) मासिक रक्कम घेईल. यात ग्राहकास कायदेशीर सल्ला मिळेल. तुमचे खाते सायबर गुन्हेगारीचे शिकार झालेली असेल तर त्याला मदत केली जाईल. सोबतच तुमचा खासगी डाटा आॅनलाइन पद्धतीने अवैधरीत्या कुणी वापरत असेल त्याबाबत ग्राहकास संदेश पाठवून अ‍ॅलर्ट करेल.

source : facebook news link

No comments