Breaking News

घृष्णेवर मंदिरात ९ ते १३ सप्टेंबर पर्यंत अतिरूद्राभिषेकाचा कार्यक्रम

 श्री घृष्णेश्वर ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने विश्वशांती, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी अतिरूद्राभिषेक करण्याचे ठरविले आहे. दर तीन वर्षांनी येणार्‍या अधिक मासात आता हा अभिषेक करण्याचे ठरविले आहे. या अतिरूद्रात पाच देशातील जलाने श्री शंकराला अभिषेक करण्यात येणार आहे यासाठी विविध ठिकाणचे २५० ब्राम्हण उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांचीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहणार आहे.
९ ते १३ सप्टेंबर २०१२ अशा पाच दिवस हा अभिषेकाचा कार्यक्रम चालणार असून या दरम्यान भाविकांना गाभार्‍यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कार्यक्रमप्रसंगी महाप्रसाद व अन्नदानाचाही कार्यक्रम संस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ९ ते १३ पाच दिवस गाभार्‍यात भाविकांना जाण्यास मनाई आहे असे संस्थान व ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

No comments