Breaking News

बसय्यै व्यायामशाळेशेजारील उघडा गणपती

गणेश उत्सव २०१२ च्या निमित्ताने आम्ही आपल्याला नवनवीन माहिती गणेशाविषयी देत आहोत. याच सदरात आम्ही आपल्यासाठी आणली आहे एक अनोखी माहिती. औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसय्यै व्यायामशाळेशेजारी एका बाजुला एक गणेशाची व हनुमानाची मुर्ती आहे. हे पुरातण मंदिर उघडा गणपती मंदीर म्हणुन ओळखले जाते. बर्‍याच जणांना याविषयी माहिती नाही पण याची अख्यायिका फार अनोखी आहे.
येथील जेष्ठ नागरीकांच्या माहितीप्रमाणे या मुर्तीचा इतिहास १५० वर्षे जुना आहे. या गणपतीला उघडा गणपती असे यासाठी म्हणतात कारण बर्‍याच जणांनी या गणपती मंदिरावर छत बांधण्याचा प्रयत्न केला पण ते छत रात्रीतुन उडून गेले. आजपर्यंत कोणीही या मंदिराव छत बांधण्यास यशस्वी झालेले नाही त्यामुळे यास उघडा गणपती असे म्हणण्यात येते. या गणपतीवर जर छत बांधावयाचे असेल तर ७ नद्यांचे पाणी आणून एकाच रात्रीत हे छत बांधल्यास ते टिकेल असे सांगण्यात येते.
या पुरातन मंदिरात भाविक मोढ्या श्रध्देने येतात व गणपती चरणी नतमस्तक होतात. ही गणपतीची मुर्ती डाव्या सोंडेची आहे.

No comments