औरंगाबादचे मार्केटिंग आता जागतीक स्तरावर होणार


औरंगाबादेतील सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्थळांना तसेच येथील संस्कृती व परंपरेला एक नवा आयाम देण्याचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घतले आहे. औरंगाबादचे पर्यटन मार्केटिंग आता जागतीक स्तरावर होणार आहे. यासाठी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय पर्यटन परीषद शनिवार पासून सुरू होणार आहे. औरंगाबादला पर्यटन नगरी (ट्रव्हल मेट्रो सिटी) असा दर्जा यापूर्वीच मिळाला आहे. परंतु औरंगाबादेत विदेशी पर्यटकांचा ओघ जरा कमीच आहे. हा ओघ वाढविण्यासाठी या खास परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
३५ देशातील वाणिज्य दूत या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून शनिवार दि.०८ सप्टेंबर २०१२ रोजी या कार्यक्रमाचे उद्‌घाटन पर्यटन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ करणार आहेत. येणारे हे वाणिज्य दूत औरंगाबादेतील ऐतिहासिक स्थळांनाही भेटी देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments