Breaking News

इंडस्ट्रीअल कॉरीडोअर चा मार्ग मोकळा, शेतकर्‍यांच्या जमीनीना एकरी २३ लाख रू.भाव

अखेर मुंबई व दिल्ली कॉरीडोअरचा आणि औरंगाबाद शहराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत करमाड येथील शेतकर्‍यांच्या जमीनीला एकरी २३ लाख रू इतका भाव देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. सरकारने पुर्वी जाहिर केलेल्या भावापेक्षा तीन लाख रूपये इतका जास्त भाव आता शेतकर्‍यांना मिळाणार आहे त्यामुळे करमाडवासी शेतकरी खुश आहेत.  योग्य भाव मिळत नसल्यामुळे येथील शेतर्‍यांचा या औद्योगिक विकासाला नकार होता. परंतु प्रशासनाने येथील शेतकर्‍यांना त्याचा फायदा समजावून सांगितलामुळे आता हा प्रश्न सुटला आहे.
हा प्रश्न सोडविण्यामध्ये फुलंब्री येथील आमदार डॉ.कल्याण काळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पारीत केला. या भुसंपादनात शेतकर्‍यांच्या विहरी,फळबागा,बांधकाम,गोठे इत्यादींचा वेगळा मोबलाही मिळणार आहे.
जमीनीचा हा प्रश्न सुटल्यामुळे आता औरंगाबदच्या औद्योगिक विकासाला एक नवी गती व एक नवा आयाम मिळणार आहे. शेंद्रा पंतारांकीत वसाहतीत आणखी हा एक मानाचा तुराच म्हणावा लागेल.

source : aurangabadtravel reporter

No comments