नोकियाचा विंडोज-८ स्मार्टफोन फोन सादर

नोकियाने न्यूयॉर्कमध्ये बुधवारी रात्री आपले ल्युमिया ९२० आणि ८२० हे बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सादर केले. पहिल्यांदाच नोकियाच्या स्मार्टफोनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या विंडोज-८ ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून नोकिया अ‍ॅपल आणि सॅमसंगच्या तुलनेत बराच पिछाडीवर पडला आहे. फोनच्या बाजारात पुन्हा मुसंडी मारण्यासाठी नोकियाने सर्व शक्ती एकवटून ल्युमियाच्या रूपाने नवा डाव टाकला आहे. ल्युमिया-९२० फोनची किंमत ३९ हजार ते ४० हजार रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. नोकियाला या मालिकेपासून खूप आशा आहेत.

ल्युमिया -९२० : विंडोज -८ ओएस, ४ .५ इंच एलसीडी, एचडी टच स्क्रीन, प्युअर मोशन एचडी टच तंत्रज्ञान, क्वांटम एस-४ , १ .५ ड्युअल कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एस-४ प्रोसेसर, ८ .७ मेगापिक्सेल प्युअर मोशन व्ह्यू विथ एचडी व्हिडिओसह, १ .२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ३ .५ एमएम आडिओ जॅक, पाच रंगात वन पीस पॉलिकार्बोनेट बॉडी, इंटरनेट एक्सप्लोरर १० , २००० एमएच बॅटरी, १ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनॅल मेमरी, ३ जी, ४ जी सुसंगत, वायफाय डायरेक्ट, एज, एनएफसी, ब्ल्यूटुथ ३ .१ , जीपीएस, नोकिया मॅप सुट

ल्युमिया – ८२० : विंडोज -८ , ४ .३ इंच अमोल्ड स्क्रीन, १६ .७ मिलियन कलर्ससह सुपर सन्सेटिव्ह टच, १ .५ ड्युअल कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एस-४ प्रोसेसर, १६५० एमएच बॅटरी, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी, ८ मेगापिक्सेल कार्ल झुईस लेन्ससह फ्लॅश, व्हीजीए फ्रंट कॅमेरा, एनएफसी, वायफाय हॉटस्पॉट, ब्ल्यूटुथ ३ .१ , ए-जीपीएस, मायक्रो यूएसबी, ३ .५ एमएम आडिओ जॅक

ल्युमिया ९२० मध्ये काय आहे खास

वायरलेस चार्जिंग या स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी चार्जर लावण्याची गरज नाही. वायरलेस चार्जिंग पॉडवर तो ठेवल्यास आपोआप चार्ज होईल. यात नोकियाने २००० एमएच या आतापर्यंतच्या सर्वात तगडी बॅटरीचा वापर केला आहे. स्काय ड्राइव्ह स्टोरेज : मायक्रोसॉफ्टची क्लाऊट कॉम्प्युटिंग सेवा स्काय ड्राइव्हची ७ जीबी स्टोरेज सुविधा मोफत.  प्युअर व्ह्यू कॅमेरा : हलणाºया वस्तूंचीही सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतात. अंधारात घेतलेले फोटो कोणत्याही स्मार्टफोनपेक्षा ५ ते १० पटींनी सुस्पष्ट दिसतील. इमेज बॅलेन्स फीचर. कार्ल झुईस ऑप्टिक्सयुक्त ८ .७ मेगापिक्सेल कॅमेरा. उच्च दर्जाचा एलईडी फ्लॅश.

No comments