Breaking News

हज यात्रेसाठी औरंगाबादहून पहिला जत्था रवाना...सौदी अरेबीयाचे खास विमान थेट औरंगाबादेतून !

Direct Flight To Saudi Arebia From Chikalthana Airport, Aurangabad
हज हे मुस्लिमांचे पवित्र स्थान आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुस्लिम लोक हे या पवित्र हज ला म्हणजेच सौदी अरेबीयातील मक्का या ठिकाणी जातात. मुस्लिम धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी हज यात्रा करायला हवी असा मानस आहे. महोम्मद पैगंबराचे हे पवित्र स्थान आहे. औरंगाबादेतूनही हजारोंच्या संख्येने लोक या हज यात्रेसाठी जातात.
औरंगाबादेतून जाणार्‍या हज यात्रेकरूंसाठी खास व्यवस्था औरंगाबादेत केली जाते. यामध्ये प्रत्येक यात्रेकरूसाठी पासपोर्ट उपलब्ध करून देणे त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते.  हज यात्रेकरूनां २ ते ३ टप्प्यांमध्ये सौदी अरेबीयात पाठविण्यात येते यासाठी विमानतळापर्यंत खास बसचीही व्यवस्था आहे. हज ला जाण्यापुर्वी सर्व हज यात्रेकरूंसाठी विशेष सुचनांचा व माहितीचा कॅम्पही घेण्यात येतो यामध्ये मक्का येथे पोहचल्यानंतर कराव्या लागणार्‍या सर्व विधी तसेच पाळण्यात येणारे नियम यांची विशेष माहिती तसेच मेडिकल चेकअपही करण्यात येते. ही माहिती संगणकीकृत स्लाईडशोने दाखविण्यात येते. तसेच सर्व यात्रेकरूंची सर्वांची संगणकीकृत नोंदही होते त्यामुळे तात्काळ कोणतीही मदत व माहिती उपलब्ध होऊ शकते.
हज ला जाण्यासाठी दिनांक ०६ ऑक्टोबर २०१२ रोजी पहिला जत्था रवाना झाला आहे. यासाठी सौदी अरेबीयाचे खास विमान चिकलठाणा विमानतळावर आलेले होते. सौदी अरेबीयात जाण्यासाठी थेट विमान औरंगाबादेतून आता उपलब्ध झाले आहे यामुळे हज यात्रेकरूंचा त्रास वाचला आहे.

No comments