Breaking News

औरंगाबादेत पेट्रोल टॅंकरचा विस्फोट...कोणतीही जीवतहानी नाही.

Image Source : internet
औरंगाबादेत गुरूवारी दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान शहरातील मोंढा नाका परीसरात पेट्रोल टॅंकरचा मोठा विस्फोट झाला. हा स्फोट इतका भिषण होता की या पंपाच्या जवळ उभ्या असलेल्या गाड्यांचेही खुप नुकसान झाले. अग्नीशमन दलाच्या गाड्या वेळेवर पोहचल्याने मोठे नुकसान टळले.
प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार दुपारच्या सुमारास हा टॅंकर पेट्रोल घेवून पंपावर ते खाली करण्यासाठी आला होता. नेहमीप्रमाणे पंपावरील कर्मचारी हे पेट्रोल काढत असतांना काहीतरी चुकीमुळे ही आग लागली असावी. आधी थोड्या प्रमाणवर लागलेल्या या आगीने नंतर रौद्र रूप धारण् केले धुराचे प्रचंड लोट आकाशाकडे झेपावत होते. हा पेट्रोल पंप जुना मोंढा भागात आहे. व तेथे बाजुला वस्तीही आहे.
अग्नीशमन दलाच्या सांगण्यानुसार ही आग जर अशीच काही काळ चालू राहीली असती तर जवळपास 1 की.मी. पर्यंतच्या परीसराला याचा धोका होता. अग्नीशमन दलाच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये पाणी व फोमचा वापर आग विझविण्यासाठी केला गेला. यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

No comments