Breaking News

लखलखत्या दिव्यांची दिपावली, सुरक्षित दिपावली : स्वागतम् दिपावली 2012

लखलखत्या दिव्यांच्या दिपावलीचे आणि आपले जीवन प्रकाशमय करणार्‍या दिपावलीचे आगमन येत्या 13 ऑक्टोबर 2012 रोजी होत आहे. ही दिपावली कशी आनंदमयी आणि सुरक्षीत साजरी कराल याची संपुर्ण माहिती आम्ही आपल्याला या खास दिपावली स्पेशल आर्टीकल मधुन देणार आहोत. दिपावली हा भारतीयांचा पारंपारीक सण. यादिवशी आपण अज्ञानरुपी अंधकाराचा नाश दिपावलीच्या तेजोमयी प्रकाशाने करायचा आहे. आणि जुन्या वाईट गोष्टी सोडून नव्या आनंददायी आणि उत्साही आयुष्याकडे आपण वाटचाल करावी हा या दिपावलीचा हेतू आहे.

दिपावली साजरी करतांना सुरक्षिततेचे काही उपाय
०१)  फटाके खरेदी करतांना ते नेहमी अधिकृत दुकानातूनच खरेदी करावे.
०२)  जळालेल्या फटाक्यांची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून इतरांना आपल्यामुळे ञास होणार नाही.
०३)  लहान मुलांना फटाक्यांपासून नेहमी दूर ठेवावे.
०४)  कमी आवाजाचे फोडण्याचा प्रयत्‍न करावा. जेणे करून ध्वनीप्रदुषण्‍ा रोखता येईल.
०५)  आजारी व वृध्द माणसांपासून दूर फटाके उडवावेत.
०६)  फटाके पेटवतांना पायात चप्पल घालावयाला विसरू नये.
०७)  अडीअडचणीच्या रस्त्यावर रॉकेट सारखे फटाके उडवू नए. मोकळया मैदानाचा वापर करावा.
०८)  आपआपल्या स्थानिक व ठरवून दिलेल्या वेळेतच फटाके उडवावेत.
०९)  सावधगीरी म्हणून आपल्याजवळ नेहमी फर्स्ट एड बॉक्स, पाणी अथवा वाळू भ्रलेली बादली ठेवावी.
१०) फटाके उडविल्यानंतर हात व पाय स्वच्छ साबणाने धुवावेत जेणे करून विषारी रसायनांची बाधा आपल्याला होणार नाही.

सरकारने १२५ डेसिबल पेक्षा जास्त आवाज असणार्‍या फटाक्यांवर आधिच बंदी घातली आहे. दिपावली आवाज व प्रदुषणाचे जास्त दुष्परीणाम जाणवतात यामध्ये अचानक वाढलेल्या आवाजामुळे बहिरेपणा, उच्च्‍ा रक्तदाब, झोपसंबंधी विकार जाणवायला लागतात. त्यामुळे ही दिपावली आपण सुरक्षित व प्रेमाची एक सुंदर भेट एकमेकांना देवून साजरी करावी.
 
आपल्या पर्यावरणासाठी व इतर प्राणीमाञांसाठी अनुकूल असा येणारा हा दिपावली सण आपण बनवावा हीच आपण्‍ा सर्व मिळून प्रतिज्ञा करूया. आपल्याही काही प्रतिक्रिया आमच्या सोबत कॉमेन्टस् रूपाने शेअर करा अथवा आजच आमच्या फेसबुक अकाउंट वर लॉगइन करा व जॉईन व्हा.

No comments