Breaking News

औरंगाबादेत ९ होलचा 32 एकरांवरील पहिला गोल्फ कोर्स सज्ज...गोल्फ प्रेमींसाठी पर्वणी

This is Reference Image Only sutable for article
ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा आता झपाट्याने विकास होत आहे. औद्योगिक शहर अशी ओळख असलेले औरंगाबादच्या वैभावत आणखी भर पडली आहे ती पडेगांव येथील 32 एकरांच्या परीसरात उभारल्या गेलेल्या भव्गोल्फ कोर्सने. गोल्फ ची आवड असणार्‍यांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल. औरंगाबाद येथील एम.जी.एम. गोल्फ क्लबच्या वतीने शनिवारपासून गोल्फ प्रशिक्षण देण्यासही सुरुवात झाली आहे. एम.जी.एम. च्या पुढाकाराने हे 32 एकरावरील मैदान तयार झाले आहे. हा गोल्फ क्लब निसर्गरम्य असून अनेक अत्याधुनिक सुविधा यात देण्यात आल्या आहेत. अमेरीकेतील स्थापत्य अभियंत्याच्या निदर्शनाखली हे मैदान बनविण्यात आले आहे.

या गोल्फ क्लबच्या प्रशिक्षणासाठी ६000 रु. इतका खर्च आकारण्यात येणार आहे व खेळासाठी लागणोर सर्व साहित्य क्लबच्या वतीने पुरविण्यात येणार आहे. तज्ञ प्रशिक्षकांकडून खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. या मैदानावर खास रेस्टारंट व कॉटेजस् चीही व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाडयातील खेळाडूंना गोल्फविषयी अधिक माहिती मिळावी व एक उत्कृष्ट गोल्फपटू तयार व्हावा हा या गोल्फ क्लबचा मानस आहे. शहराची पुढील प्रगती लक्षात घेवुन एम.जी.एम. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्थुत्य आहे.

ोल्फ क्लबचे लोकेश : पडेगव, औरंगाबादपासून 5 की.मी

औरंगाबाद ट्रव्हल् वरील र्टीकल्आता मराठीतून सुध्दा. नवीन र्टीकल्स व औरंगाबादेतील ताज्या बातम्यांसाठी दररोज वाचा. आमचे ऍ़ड्रईड ऍ़प पण उपलब्.

No comments