Breaking News

आपली दिवाळी साजरी करा apple आयफोन -5 ने...

apple चा बहुचर्चित आणि प्रसिध्‍द आयफोन-5 मुंबईसह नवीदिल्ली, गुडगांव, बंगलोरमध्ये शुक्रवारी दि. 2 नोव्हेंबर 2012 रोजी लॉन्च झला आहे.  अभिनेञी ईशा देओल हिच्या हस्ते आयफोनचे लॉन्चींग करण्यात आले. या स्मार्टफोनची किंमत 45,500 रुपयांपासून पुढे असणार आहे. सॅमसंग गॅलेक्‍सी टॅब व फोनला कडवी टक्‍कर देणारा apple चा हा 5 सीरीज चा फोन आहे. ऑनलाइन रीटेल स्टोर Saholic वर या फोनबाबत माहिती देण्यात आली आहे. ऑनलाइन ऑर्डर केल्यास अवघ्या 8 दिवसांत आयफोन-5 तुमच्या घरी येईल. तेंव्हा हि दिवाळी आपल्यासाठी खासच असणार आहे.

Redington India आणि Ingram Micro ह्या दोन कंपन्यांना प्रमुख्‍ डिस्ट्रीब्युटर करण्‍यात आले आहे.  देशभरातील 40 प्रमुख स्टोअर्सवर आपल्याला हा फोन खरेदी करता येईल.
आयफोन ब्लॅक आणि स्लेट अशा दोन रंगात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे 12 महिन्यांची गॅरेंटी या फोनसोबत येणार आहे. apple सीरीज मधील हा सगळयात advance फोन असणार आहे. apple ने ह्या फोनची उंची पण पहिल्‍या फोनपेक्षा वाढविली असून apps ही भरपूर आहेत. तसेच apple च्या ऑनलाईन apps स्‍टोअरवर जावून अधिक apps हि डाउनलोड करता येतील.

apple आयफोन 5 च्‍या भारतातील कींमती पुढीलप्रमाणे असणार आहेत.
16 GB मेमोरी असलेल्या आयफोन- 5 ची किंमत 45,500 रुपये
32 GB मेमोरी असलेल्या आयफोन-5 ची किंमत 52,500 रुपये
64 GB मेमोरी असलेल्या आयफोन-5 ची किंमत 59,500 रुपये

आतापर्यंतची ही सर्वात महागडी रेंज apple ने सादर केली आहे. फोन खरेदीने आपल्‍या खिशाला काञी बसणार हे नक्‍की. उद्योगाशी संबंधित सूत्रांनी आयफोन-5 च्या भारतातील लाँचिंगच्या तारखेला दुजोरा दिला आहे. भारतात अ‍ॅपल आयफोनच्या या मॉडेलची प्रतीक्षा आहे, ती आता लवकरच संपणार आहे. आयफोन-5 हा जगातील आजवरचा सर्वात वेगाने विक्री होणारा स्मार्टफोन आहे. अमेरिकेत लाँच झाल्याच्या पहिल्या आठवड्यातच त्याचे 50 लाख हँडसेट हातोहात विकले गेले आहेत. आयफोन-5 ची किंमत आणखी वाढू शकते असे 'इनग्राम' या भारतीय संकेत स्थळावर देण्‍यात आली आहे.

आयफोनची काही खास वैशिष्टये :
आयफोन-५ची जाडी ७.६ मिलीमीटर
वजन ११२ ग्रॅम आहे. आयफोन-५ची स्क्रीन ४ इंची.
याशिवाय नवीन आयफोन-५मध्ये नॅव्हिगेशन
सिस्टीमही पहिल्यापेक्षा अधिक उत्तम आहे.
तसंच आयफोन-5 मध्ये apple ची नवीन ए-६ ही चीप बसवली आहे.
त्यामुळे या बॅटरी लाइफही अधिक असेल. अत्याधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या या फोनमुळे आठ
तासांपर्यंत ब्राऊजिंग करता येईल,
असा दावाही apple ने केला आहे.

तर मिञांनो तयार रहा. अधिक माहितीसाठी आमचे औरंगाबाद ट्रॅव्‍हल्‍स ह्या संकेतस्‍थळास विझीट देत रहा. आता बरेच नवीन आर्टीकल्स खास आपल्यासाठी मराठीतही प्रसिध्द करीत आहोत. ह्या दिवाळीच्या शुभमूर्तावर.

Tags : apple i phone 5, iphone-5 news, iphone 5 updates

No comments