Breaking News

ह्या दिवाळीला शॉपींग करा जपून....साजरी करा बजेट दिवाळी

सणासुदीच्या दिवसात बाजारात आपल्याला उत्साहाचे वातावरण दिसते विशेषत: दसरा आणि दिवाळी हे सण भारतीय उत्सव व परंपरेतील सर्वात मोठे सण आहेत. यावेळेस प्रत्येक जण नवीन काहीतरी खरेदी करण्याच्या आनंदात असतो व बाजारपेठेत याच वेळेस लाखों करोडोंची उलाढाल होते. परंतु अशावेळी आंधळेपणाने केलेली खरेदीत आपली फसगत होण्याची जास्त श्यक्यता असते त्यामुळे आम्ही काही खास शॉपींग टीप्स आपणाला देत आहोत.

1986 च्या ग्राह संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला ६ महत्वपूर्ण अधिकार मिळालेले आहे ते म्हणजे सुरक्षेचा हक्क, वस्तू किंवा सेवा आपल्या इच्छेप्रमाणे निवडण्याचा हक्क,ग्राहकाचे म्हणणे ऐकले जाण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, ग्राहक म्हणून जबाबदारी व कर्तव्ये पार पाडण्यासाठी ग्राहक शिक्षण मिळवण्याचा हक्क. या हक्कांव्दारे आज सर्वसामान्‍य ग्राहक खरेदीत होणार्‍या फसगतीची तक्रार करु शकतो.

आपण तक्रारी पुढील गोष्‍टींसाठी करु शकतो.
 • खरेदी केलेल्या किंवा खरेदीच्या कराराने घेतलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळणे.
 • भड्याने किंवा भड्याच्या कराराने घेतलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळणे.
 • छापील कींमतीपेक्षा जास्त कींमतीला मला विकणे.
 • ग्राहकाच्या जीवाला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा वस्तूंची विक्री करणे. इ. हे हक्क आपण बँक सेवा, प्रवास, वीजपुरवठा, हॉटेल्स, करमणुकीची साधने, टेलिफोन व मोबाईल सेवा, माहिती प्रसारण, वैद्यकीय सेवा इत्यादी सार्वजनिक सेवांच्या संदीर्भात आढळून आल्यास ग्राहक मंचात वापरु शकतो.

दिपावलीत शॉपींग करतांना ह्या गोष्‍टी लक्षात ठेवा.
 1. केवळ आकर्षक जाहिरातीला बळी पडून वस्तू खरेदीच्या नादात पडू नका.
 2. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची प्राथमिक गरज लक्षात घेवूनच ती वस्तू खरेदी करा अन्याथा वस्तू खरेदी टाळा.
 3. खाद्यपदार्थ व डेली निडस् विकत घेतांना त्यात भेसळ नाही अन्यथा ते डुप्लीकेट नाही हे अवश्य तपासून बघा.
 4. आपल्या खञीशीर दुकानातूनच खाद्यपदार्थांचे सामान खरेदी करा त्यामुळे आपल्याला धोका होणार नाही.
 5. एल.सी.डी अथवा एल.ई.डी खरेदीपुर्वी त्याची गुणवत्ता तपासून बघा.
 6. ३ डी टी.व्ही खरेदी करतांना त्याची आपल्याला खरच गरज आहे का हे तपासून बघा. कारण भारतात आजून पर्यंत एकही चॅनेलने ३डी प्रसारण सेवा सुरु केलेली नाही. त्यामुळे व्यर्थ खर्च टाळा.
 7. दुकानदाराला सणांच्या आफॅरविषयी व्यवस्थीत विचारा व आपला फायदा होत असेल तर वस्तू खरेदी करा.
आपल्या जवळीलही काही टिप्स कॉमेन्ट रुपाने शेअर करा...

ही दीपावली आपणाला आनंदाची जावो...तेजोमयी दिपावली...

आजच आम्हाला फेसबुकवर जॉइन व्हा.

No comments