Breaking News

औरंगाबादच्या सिध्दार्थ गार्डन मधील प्राणिसंग्रहालयाचे रूप पालटणार...सुनील शेट्टी पॅटर्न औरंगाबादेत

औरंगाबदेतील प्रसिध्द व लहान - मोठ्यांचे आकर्षणाचे केंद्र असलेले सिध्दार्थ गार्डन आता आपले रूप पालटणार आहे. मुंबईच्या प्रसिध्द डिस्नीलँडच्या धर्तीवर येथील गार्डनमध्ये बदल करण्यात येणार आहेत. यासाठी प्रसिध्द अभिनेता सुनील शेट्टी याचीही मदत घेण्यात येणार आहे. पडेगाव परीसरामध्ये महापालिकेला सफारी पार्क तयार करावयाचे होते त्याचा प्रस्ताव ही केंद्राकडे पाठविण्यात आला परंतू केंद्राकडून त्याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे आता येथील आहे तेच गार्डन अधिक विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 
सध्या सिध्दार्थ गार्डन हे 14 एकर परिसरात आहे परंतू त्याचा विस्तार आता 25 एकरापर्यंत करण्याचा पालिकेचा मानस आहे. सध्या सिध्दार्थ गार्डनमधील नव नवीन खेळणी छोटयांच्या आकर्षणाचा भाग बनल्या आहेत आजूनही नव नवीन खेळणी आणण्याचा पालिकेचा प्रयत्‍न आहे. सुनील शेटटी यांनी भारतातील विविध भागांध्ये प्राणीसंग्रहालये उभारली आहेत त्यामुळे त्यांच्या अनुभवांचा चांगलाच फायदा सिध्दार्थ गार्डनच्या विकासात होणार आहे. विकसित झालेल्या नव्या गार्डनमध्ये येथील असलेले प्राणी नक्कीच मोकळा श्वास घेतील यात शंका नाही. या नवीन विकासकामाला औरंगाबादट्रॅव्हल्स च्या वतीने शुभेच्छा.
आजच आम्हाला फेसबुकवर जॉईन व्हा आणि मिळवा शहरातील ताजे अपडेट दररोज तसेच शहरातील विविध छोटे, मोठे व्यवसाय शोधा आमच्या या दिवाळीपासून सूरू झलेल्या नवीन ऑनलाईन सीटी क्लासीफाईड मधून...आजच भेट द्या...http://www.clickkhoj.com/

No comments