Breaking News

ऐकावे ते नवलच ! आता हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी वापरा ‘ब्लूटूथ स्टीक’


हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी एका अमेरिकी कंपनीने ‘ब्लूटूथ स्टीक’ तयार केले असून हे स्टीकर चिकटवल्यानंतर हरवलेली वस्तू शोधणे अत्यंत सहजसोपे होणार आहे.आपली मनीपर्स, किल्ल्या एवढेच नव्हेतर अगदी मुले अथवा घरातील पाळीव प्राणीही पालकांच्या नेटवर्क बाहेर जाणार नाहीत. स्मार्टफोनच्या अ‍ॅपवर चालणारे हे स्टिकर आपल्या मौल्यवान वस्तूंना लावता येऊ शकते. गहाळ झालेली वस्तू शोधताना स्मार्टफोनमुळे त्यातील बझर लगेच सूचना देतो. शिवाय अ‍ॅपमध्ये रडार सारखी यंत्रणा असून त्याद्वारे हरवलेल्या वस्तूंचा माग काढणेही शक्य आहे. वस्तू टप्यात येताच स्मार्टफोनचा बझर वाजतो. शंभरफूट अंतरापर्यंत रेंज असलेल्या या स्टीकरची बॅटरी एक वर्षापर्यंत चालू शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. नाण्याएवढे छोटे स्टिकर - ‘स्टीक एन फाइंड’नावाचे हे स्टीकर पाच रुपयांच्या नाण्याएवढ्या आकाराचे आहे. त्यातून निघणारे ब्लूटूथ सिग्नल्स फारसे प्रभावी नसतात पण किमान शंभर फुटांपर्यंत त्याची रेंज आहे. म्हणजे 100 फुटापर्यंतच्या वस्तू आपल्या नेटवर्कमध्येच राहतात असा दावा कंपनीने केला आहे.

कसे चालते कार्य - हे अ‍ॅप स्टीक एन फाइंड स्टीकर लावलेल्या वस्तूपासूनचे अंतर रडार स्क्रीनवर दाखवते. सध्यातरी या अ‍ॅपमध्ये वस्तूची जागा अथवा दिशा कळू शकत नाही त्यामुळे अ‍ॅपवर नजर ठेवून वस्तूचा माग काढावा लागतो. ठरावीक टप्प्यात येताच स्मार्टफोनचा बझर वाजतो.मात्र बझर वाजण्यासाठी अंतर किती ठेवायचे ते आपण सेट करू शकतो. त्यामुळे वस्तू टप्प्यात येताच आपल्याला कळू शकते. एखादी वस्तू रेंज बाहेर असल्यास त्याचाही माग काढता येऊ शकतो.म्हणजे ती वस्तू टप्प्यात आल्यास लगेच बझर वाजतो व स्क्रीनवर ती दिसू लागते. घड्याळ्यासाठी लागणा-या सेलवर हे स्टिकर चालते. एका स्मार्टफोनची कमीत कमी 20 फोनसोबत पेअर करता येते. अमेरिकेच्या एसएसआय या कंपनीतील इंजिनियर जॉन मिटस् हे स्टीक एन फाइंड स्टिकरचे जनक आहेत.


याचा युटयुब व्हिडीओ पहा
video : http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=6lkiblLfkVk

No comments