Breaking News

औरंगाबादचा तरुण अनुभवतोय वेगाचा जीवघेणा थरार !


औरंगाबाद शहराचा आता झपाटयाने विकास होत आहे. औद्योगिक विकासाबरोबरच वाढते शहरीकरण्‍ा व त्यातच औरंगाबाद शहराची पुणे, मुंबई प्रमाणे मेट्रो सीटी कडे होणारी वाढ या सर्वांमुळे औरंगाबादचे रुप पालटत आहे. त्यातच औरंगाबाद शहराची वाहतूक सुरळीत व्हावी व औरंगाबादच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून मोठया उड्डाणपुलांचे निर्माण येथे होत आहे यात मुख्यत्वे पुर्ण झालेले उड्डाणपुल म्हणजे ७ हिल आणि क्रांतीचौक येथील उड्डाणपुल. 

या विकासाबरोबरच औरंगाबाद शहरातील तरुण पीढी अनुभवते आहे वेगाचा जीवघेणा थरार. वाढत्या स्पर्धेमुळे 2 व्हीलर बाईचा व्यवसाय तेजीत चालला आहे त्यातच आधुनिक व स्पोर्टस् लुक असलेल्या बाईक हे औरंगाबादमधील तरूणांचे खास आकर्षण्‍ा आहे. बाईक्स बनविणार्‍या कंपन्या आधिक गती असणार्‍या स्पोर्टस् बाईकचे निमार्ण करत आहे आणि यातच तरूणांना लागले आहे जीवघेण्या वेगाच्या थराराचे व्यसन. एखाद्या चिञपटात शोभावे असे स्टंटस् तर औरंगाबादच्या रस्त्यावर नेहमी पहावयास मिळतात. शहरातील कॅनॉट प्लेस मध्ये तर याचा नेहमी प्रत्यय आपल्याला येतोच. परंतु हे सर्व का व कशासाठी ?

औरंगाबादमीधील अपघातांचे प्रमाण या कारणाने वाढले आहेत. शहरात आकाशवाणी येथील २ तरूणांच्या अपघाताचे वृत्त ताजे असतांनाच आज दिनांक 18 डिसेंबर 2012 रोजी अशाच एका वेगाच्या जीवघेण्या वेगाच्या थरारात क्रांतीचौक उड्डाणपुलावरून पडुन एका तरुणाचा र्दुदैवी मृत्यू झला तसेच आकाशवाणी जवळ झालेल्या करीझ्मा बाईकच्या अपघातातील १ तरुणाचा मृत्यू व दुसर्‍या तरूणास आपला पाय गमवावा लागला. औरंगाबादमधील तरूण ऍ़क्शन चिञपटातील स्टंटस् ची सर्रास कॉपी करतात पण त्यांना हे माहित नसते की हे सर्व सीन्स विशिष्ट सुरक्षा घेवुन करण्यात येतात. उगाचच इंप्रेस करण्याच्या नादात तरूणांना आपला जीव गमवावा लागतो आहे.

औरंगाबादमधील प्रत्येक तरूणाने खालील काही गोष्टींचा जरूर विचार करावा..
 1. शहराची वाहतून व्यवस्था सुधारावी म्हणून महानगर पालीकेने येथे उड्डाणपुलांची निर्मीती केली आहे. उड्डाणपुलावर आपल्या गाडीचा वेग मर्यादीत ठेवा.
 2. शहरात गाडी चालवितांना गाडीचा वेग साधारणत: 30 ते 40 की.मी पर्यंतच ठेवावा.
 3. प्रत्येकाने गाडी चालवितांना हेल्मेटचा वापर करावा.
 4. नवीन बाईक खरेदी करतांना ती चालविण्याविषयीची योग्य माहिती तेथील टेक्नीशियन करुन घ्यावी.
 5. आपल्या पुढे चालणर्‍या कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नए.
 6. वळण घेण्यासाठी गाडीचे इंडिकेटर अथवा आरटीओ नियमांप्रमाणे हाताचा वापर करावा.
 7. उगाचच इंप्रेस करण्याच्या नादात गाडीचा वेग वाढवू नऐ.
 8. शहरात गाडी चालवितांना ट्रीपल सीट बाईक कधीही चालवू नए.
 9. गाडी वेगात चालवितांना तीचा अंदाज आपल्याला येत नाही त्यामुळे शक्यतो ते टाळावे.
 10. चिञपटातील स्टंट हे विशेष तांञिक शिक्षण घेतलेले लोकच करतात व सुरक्षिततेचा ते वापर करतात त्याचे अनुकरण्‍ा करू नए.
 11. आपल्याला बाईक चालविता येत नसेल तर उगाच ती चालविण्याचे धाडस करू नए.
 12. चांगल्या प्रशिक्षकाकडून योग्य रितीने गाडी चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे.
 13. आरटीओ ने शहरात घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच गाडी चालवावी.
 14. रस्त्यावरील सिग्नल्स व दिशादर्शकांचे, नियमांचे योग्य पालन करावे.

शेवटी आपले जीवन हे अनमोल आहे....आणि आपल्या बाईकचे नियंञण ही आपल्या हातात आहे..तेव्हा वेगाला आवर घाला...सुरक्षित प्रवास करा..

No comments