Breaking News

संत एकनाथ महाराज व पैठण या संतभुमीची संपुर्ण माहीती आता वाचा मराठीत...

पैठण हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालीवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते. राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं. इ.स. १३१२ च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. त्याकाळी हजारो हिंदुंना धर्मांतरित करण्यात आलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं. पैठणने जगास अनेक नररत्‍ने दिली असून शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्‍तेश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो.


अधिक माहितीसाठी अवश्य वाचा http://santeknath.org/jivangatha.html

सद्यस्थितीत पैठण हे शहर संत एकनाथांच्यामुळे जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवत असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून याचे महत्व वाढत आहे. प्रतिदिनी नाथांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या २ ते ३ हजार एवढी असून येथे दर शुद्ध एकादशीस एक लाख भाविक तर वद्य एकादशीस अंदाजे ३० हजार भाविक जमतात. एकनाथषष्ठी हा येथिल मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ५ ते ६ लाख भविक पैठणमध्ये येतात. येथे अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी येथे राहतात.

अधिक माहितीसाठी अवश्य वाचा http://santeknath.org/jivangatha.html

नाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी आश्वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. नाथांचे मातापिता नाथांच्या बालपणात निवर्तल्यामुळे आजी आजोबांनी नाथांचा सांभाळ केला. बालपणापासूनच नाथांना भगवद्‍भक्‍तीचे वेड. गुरुकृपेने भगवंताची भेट होते हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे जनार्दन स्वामी नावाचे दत्‍तभक्‍त किल्लेदार म्हणुन होते. नाथांनी त्यांना पाहताच सद्‍गुरू मानून मनोभावे सेवा केली. नाथांची सेवा पाहुन स्वामींनी त्यानां शिष्य म्हणुन स्वीकारले. स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्याच्या शिखरातील गुहेत दत्‍तध्यान करीत. एके दिवशी स्वामी ध्यानात असताना परकीयांचे आक्रमण झाले. सद्‍गुरुंची समाधी भंग होऊ नये म्हणुन नाथ हाती तलवार घेवून घोडयावर स्वार झाले. लढाई केली आणि शत्रुंचा पराभव केला. निस्सिम सेवेने नाथ दत्‍तात्रय दर्शनास पात्र झाल्याचे पाहुन शुलिभंजन पर्वतावर त्यांना पहिले दत्‍तदर्शन स्वामींनी घडविले. पुढे तीर्थयात्रा करुन नाथ पैठणास पोचले.

अधिक माहितीसाठी अवश्य वाचा http://santeknath.org/jivangatha.html

सद्‍गुरुंच्या आदेशाप्रमाणे पैठण येथेच वास्तव्य करुन नाथ गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले. नाथांची पत्नी गिरिजाबाई ह्या सुशील आणि तत्पर होत्या. त्यांना तीन अपत्ये झाली. गोदा, हरिपंडीत व गंगा. नाथांचा प्रपंच व परमार्थ हे दोन्हीही फुलू लागले. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांना कळावे या उद्देशाने त्यांनी ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली. त्यावरुन त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला. परंतु त्यास न जुमानता लोकोद्धारार्थ नाथांनी लोकांच्याच भाषेत भारुडादींच्या मार्गाने लोकांना परमार्थमार्गास लावले. लोकोद्धारासाठी वाङमयाच्या व आचरणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले.

अधिक माहितीसाठी अवश्य वाचा http://santeknath.org/jivangatha.html

No comments