Breaking News

औरंगाबाद ट्रॅव्हल्स च्या वाचकांसाठी कॉम्प्युटर व्हायरस विषयी महत्वाची माहिती


व्हायरस....हा शब्द ऐकल्यावर आपल्याला दचकायला होतं....आपल्या संगणकात व्हायरस आला तर ह्या नुसत्या कल्पनेने आपल्याला घाबरायला होतं याचं कारणही तसेच आहे ते म्हणजे आपल्या संगणकात निर्माण होणारा दोष तसेच आपल्या वेळेचा, श्रमाचा होणारा अपव्यय इ.. अगदी याच कारणांसाठी हे व्हायरस निर्माण केले जातात. व्हायरस चे वेगवेगळे प्रकार व त्यापासून आपण कसा बचाव कराल ह्याची माहिती आम्ही आज आपणास देत आहोत.

व्हायरस म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला सर्दी होते, ताप येतो इ. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरात होणारा विषाणूंचा प्रसार असतो. अगदी याचप्रमाणे संगणकातही विषाणूंचा प्रसार होतो आणि यालाच आपण व्हायरस म्हणतो. व्हायरस म्हणजे असे काही प्रोग्रॉम्स ज्यांना आपले कॉम्प्युटर खराब करण्याच्या आज्ञा दिलेल्या असतात व ते आपल्या संगणकात शिरल्यावर त्या आज्ञांप्रमाणे ते आपला संगणक खराब करतात. आणि शेवटी आपला संगणक खराब होतो.

अगदी सर्वच व्हायरस आपल्या संगणकाला धोका पसरवतात असे नाही. याबाबत दररोज विकृत माणसांचे नवीन संशोधन चालूच असते.  इंटरनेट चा वाढता प्रसार आणि दररोज सर्व व्यवसायात वाढणारा संगणकांचा आणि इंटरनेटचा वापर यामुळे व्हायरस तयार करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. आता व्हायरसचा उपयोग फक्त संकणक खराब करण्यासाठीच होत नाही तर संगणकातील गुप्त माहिती चोरणे, पासवर्ड चोरणे, क्रेडीट कार्डांची माहिती चोरणे, एकद्या गोष्टीची जाहिरात करणे, बँक अकाउंटस् ची माहिती गोळा करणे इ. प्रकारांत केला जातो. व्हायरस चे प्रकार पुढीलप्रमाणे.

फिशिंग : व्हायरस सारखीच इंटरनेट वर आधारीत ही संकल्पना आहे हीचा उद्येश आपली महत्वाची व गोपनयी माहिती जसे क्रेडीट कार्ड नंबर, पासवर्ड, ई मेल पासवर्ड चोरणे इ. या प्रकारामध्ये आपल्याला बँक अकाउंट, क्रेडी कार्ड अकाउंट पासवर्ड इ. चा नंबर अथवा पासवर्ड टाकण्या सांगीतले जाते काही वेळेला तर बनावट लॉगीन पेजेस ही बनविले जातात व त्याची लींक आपल्याला ईमेल केली जाते त्या लींक वर क्लि केल्यावर हा आपल्या बँकेनेच पाठविला आहे व महत्वाच्या गोष्टींसाठी आपली माहिती लागत आहे असा आभास निर्माण केला जातो या पेजवर गेल्यावर त्याचे डिझाईनही बँक अथवा क्रेडीट कार्डसाईट सारखेच असते पण इथे भरलेला सगळा डेटा व्हायरसकरत्याच्या जवळ जातो. तेव्हा फिशींग पासून नेहमी सावधान रहा व सार्वजनीक इंटरनेट कॅफे इ. ठिकाणी सहसा आपला क्रेडट कार्ड व बँक अकाउंट चा डेटा शेअर करु नका.

मालवेअर : मालवेअर हे मालकाच्या माहितीपूर्ण संमतीशिवाय संगणक सिस्टिममध्ये शिरकाव करणारे किंवा नुकसान करण्यासाठी डिझाइन केलेले सॉफ्टवेअर आहे. ही एक सामान्य संज्ञा असून विविध स्वरूपातील विरोध, अनाहुत प्रवेश किंवा त्रास देणारे सॉफ्टवेअरसाठी वापरली जाते आणि समाविष्ट केली जाऊ शकते:

व्हायरस : स्वत:ला कॉपी करु शकणारा आणि संगणकाला दूषित करु शकणारा एक संगणक प्रोग्राम

वॉर्म : स्‍वत:ची-प्रतिकृती असलेला मालवेअर संगणक प्रोग्राम, जो संगणक नेटवर्कचा वापर त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या प्रती इतर संगणकाना नेटवर्कवर पाठवण्‍यासाठी करतो

स्पायवेअर : मालवेयर वापरकर्त्यांना समजू न देता त्यांच्याबद्दल माहितीचे छोटे भाग संकलित करते.

अ‍ॅडवेअर : संगणकात स्वयंचलितपणे जाहिराती प्ले, प्रदर्शित किंवा डाऊनलोड करणारे कोणतेही सॉफ्‍टवेअर पॅकेज.

ट्रोजन हॉर्स : एक अनूप्रयोग असल्याची बतावणी करणारा घातक प्रोग्राम असणारे सॉफ्टवेअर वापरकर्त्यासाठी सुरुवातीला इच्छित कार्य करीत असताना दिसतो, परंतु माहिती चोरतो किंवा सिस्‍टमला इजा करतो

संगणक व्हायरसला आपण कसा आळा घालू शकतो त्याचे नियम.
  • आपला अँटी-व्हायरस प्रोग्राम नेहमी अपडेट ठेवावा त्याचे अपडेटस् वेळोवेळी डाऊनलोड करावेत.

  • ज्यावेळस आपल्याला आपले कॉम्प्युटर स्लो झाल्यासारखे वाटले त्यावेळेस दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपल्या कॉम्प्युटरला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने संपूर्ण स्कॅन करुन घ्यावे.

  • ईमेलद्वारे आलेल्या कुठल्याही फाईलीली डाऊनलोड करुन उघडून पहाण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.

  • अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ऑटो अनेबल मोडवर ठेवावे म्हणजेच ते आपणहून व्हायरस शोधण्याचे काम दरवेळी करीत राहील म्हणजेच कुठलाही व्हायरस सापडल्यास अथवा आढळल्यास त्वरीत त्याची सुचना तो देतो.

  • युएसबी डेटा कॉपी करतांना ती प्रथम ऍ़ण्टीव्हायरस ने स्कॅन करावी. आताच्या नवीन ऍ़ण्टीव्हायरस प्रोग्राम मध्ये हा मोड ऍ़टो येतो आहे.

  • महत्वाचे सिरीयल नंबर, क्रेडीट कार्ड नंबर, पासवर्ड इत्यादी शॉटकर्ट की ने कॉपी करणे टाळावे कारण जेव्हा आपण एखादा शब्द पेस्ट करण्यासाठी कॉपी करतो तेव्हा तो संगणकाच्या क्लीपबोर्ड नावाच्या शॉर्ट मेमरीत साठविला जातो व ट्रोजोन, वर्म व्हासरस चा हा महत्वाचा अड्डा असतो. ज्यावेळस युझर अशी काही माहिती कॉपी करतो ती सरळ हे व्हायरस आपल्या मालकाला ती माहीती ईमेल करतात अगदी नकळत. तेव्हा डायरेक्ट कीबोर्डचा वापर करा.

  • इंटरनेट वरील कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. आपल्याला येणार्‍या ई मेल्स जसे आपल्याला लॉटरी लागली, मी आजारी आहे मला माझी संपत्ती आपल्या नावे करावयाची आहे, तुम्हाला एका मोठया कंपनीकडून नौकरीची ऑफर आहे इ. प्रकाराच्या स्पॅम मेलवर लक्ष देवू नका ते आपली फसवणुक करण्याच्या इराद्याने केलेले असतात. आपल्या विवेकाचा नेहमी वापर करा.

  • आपली जर ऑनलाईन फसवणुक झाली असेल तर त्याची रितसर पोलीस्ट स्टेशन मध्ये नोंद करा.

No comments