Breaking News

Shree Jagdambamata Devasthan, Kotamgaon, Yeola Taluka


This is old Historical Temple. Mother MahaKali,MahaLaxmi & MahaSarswati these three are Together found Natrually at this place.people Came here to Ask & Fulfill thier whishesh from Godess. There is Fair for nine days in Navratra,the Hindu Festival to Worship the Godess. You will find Mind peace here It is 3 Km from Yeola in Nasik District(Maharastra). 

Devi History in Marathi Language :

श्री क्षेत्र जगदंबा देवस्थान कोटमगाव हे सेनापती तात्या टोपेंची जन्मभूमी असलेल्या येवले शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेले भाविकांचे श्रद्धास्थान. हे देवस्थान अतिशय जागृत व जाज्वल म्हणून परिचित आहे. येथे मातेची अति प्रस न्ना तेजस्वी स्वयंभू तीन फुट उंचीची शेंदरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. श्री महाकाली,श्री महलक्ष्मी, व श्री महासरस्वती हे तीनही रूप एकाच ठिकाणी पहावयास मिळत असल्याने येथे विशेष महत्व आहे. सप्तश्रुंग, माहूर, व तुळजापूर या तीन क्षेत्रांचे उगमस्थान कोटमगावची जगदंबा माता आहे तर काहींच्या मते ही महाकाली, महलक्ष्मी व महासरस्वती या तिघींचे एकरूप आहे. जगदंबेच्या स्थापनेचा काळ निश्चित नसला तरी येवला शहर वसण्याच्या शेकडो वर्ष अगोदरचे हे जागृत देवस्थान आहे. नारंदी नदीतिरी वसलेले अतिशय निसर्गरम्य असे पवित्र स्थान नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमारेषे नजीकचे देवस्थान असल्याने येथे भक्तांची नेहमीच वर्दळ दिसून येते. मातेचे अतिशय प्रशस्त असे मंदिर असून मंदिराचा कळस लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतो. मंदिराचे समोरच भव्य हॉल असून नेत्रदीपक अशी दीपमाळ उभी आहे. तसेच बाहेरील बाजूस असलेले दोन भव्य महाद्वार देवस्थानच्या वैभवात भर घालतात.

यात्रा काळात मातेला नवनवीन प्रकारच्या पैठण्यासाड्या परिधान केल्या जाऊन सोन्या चांदीचे अलंकार चढविले जातात. पुष्पमालांची सजावट केली जाते. मातेचा नैवद्य चांदीच्या ताटात व चंदनाच्या पाटावर अशा शाही थाटात दाखविला जातो. मातेचे तेजस्वी व मोहक रूप पाहून भक्तगण भारावून जातात. "उदे ग अंबे उदे आई उदे ग अंबे उदे" चा जयजयकार होतो. महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण भारतातून भक्तांचा महासागर या ठिकाणी पहावयास मिळतो. नवसाला पावणारी माता अशी या देवस्थानची ख्याती असल्याने घटी बसण्याची अतिशय जुनी व तुलनेने सर्वाधिक अशी परंपरा देसून येते. स्वत:ला उलटे टांगून नवस फेडण्याची आगळीवेगळी परंपरागत पद्धत या ठिकाणी पहावयास मिळते.

यात्राकाळात मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येऊन मंदिराची शोभा वाढविली जाते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांबरोबरच अनेक स्वयंसेवक जातीने लक्ष ठेवून असतात. सकाळ व सायंकाळ महाआरती करण्यात येऊन दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येवल्याच्या आणि तालुका परिसराच्या धार्मिकतेला या दिवसात उधान येते. येथील यात्रा अतिशय वैशिष्ट्या पूर्ण असून येथे विविध प्रकारच्या खेळण्यांच्या दुकानाबरोबरच मिठाईची दुकाने तसेच प्रसादाची दुकाने दिसतात. पाळणे व अन्य दुकाने यात्रेच्या आकर्षणात भर घालतात. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी मोफत ने-आण करण्याची विविध संस्थानकडून व्यवस्था केली जाते. येवला-कोटमगाव हा ३ कि.मी. रस्ता यात्रा काळात भाविकांनी दुतर्फा भरून वाहत असतो. यात्रा काळात हजारो भाविक नऊ दिवस श्रद्धेनुसार शंकरपाळे, खारका यांची देवीसमोर उधळण करतात. हा प्रसाद म्हणून झेलणाऱ्याचीही याप्रसंगी झुंबड उडते.


Location :

Aurangabad - Nashik Road, Kotamgaon Tal: Yeola
Pin Code:423 401


Official Website :
http://www.jagdambamata.com

How to Reach Follow the Map


View Shri Jagdambamata Kotamgaon in a larger map

No comments