Breaking News

आषाढी एकादशी ची संपुर्ण माहीती, 2013 सालातील आषाढी एकादशी 19 जुलै 2013 रोजी

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असेही म्हणतात. आषाढी एकादशी व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. ‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे. 


पंढरीचा महिमा जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

एकादशी हे व्रत कसे करावे 
आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपोषण करायचे. रात्री हरिभजनात जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत असून वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळपासून ही वारी चालू आहे. वारकरी संप्रदायाच्या जडण-घडणीविषयी संत सांगतात.

आषाढी याञेची महत्वपुर्ण बातमी वाचा खालील लिंक वर

पंढरपुरच्या विठ्ठलाविषयी थोडक्यात :
पंढरपुर येथील विठ्ठलाची मुर्ती ही प्राचीन आहे. दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याचा राजा रामराया याने ही विठ्ठलमुर्ती विजयनगर येथे नेली आणि तेथे एक भव्य मंदिर बांधुन विठ्ठलाच्या मुर्तीची प्रतिष्‍ठापना केली. त्यानंतर संत एकनाथांचे पंजोबा भानुदास महाराज यांनी ती मुर्ती विजयनगर येथून पुन्हा पंढरपुरास आणली व तिची समारंभपुर्वक प्रतिष्‍ठापना केली. दक्षिणेत मुसलमानांचे वर्चस्व चालू झाल्यावर श्री विठ्ठलमूर्ती आक्रमकांच्या हाती लागू नये; म्हणून खिस्ताब्द १६६९ मध्ये ती पंढरपूर येथून हलवून गुप्त स्थळी ठेवण्यात आली. नंतर खिस्ताब्द १६७२ मध्ये आषाढीवारीच्या वेळी मूर्ती ‘काडकुसुंबे’ या गावी न्यावी लागली. ती लपवून ठेवल्यामुळे आक्रमकांच्या हाती लागू शकली नाही. 

पंढरपुरच्या विठ्ठलाविषयी आपणास अधिक जाणून घ्यायेच असेल तर आम्ही का महत्वपुर्ण वेबसाईटच्या लिंक शेअर करत आहोत...त्यावर क्लीक करा व जाणून घ्या विठ्ठलाविषयी भरपूर काही...

No comments