Breaking News

गुगल स्ट्रीट व्ह्यु 360 डीग्री ला आता नवा भारतीय पर्याय वोनोबो !


आपण गुगल मॅपवरुन नेहमी आपले घर, गाव शोधतो व ते सापडल्यावर आपल्याला अवकाशातून ते पाहण्याचा आनंद मिळतो पण जर आपण या गावात फिरु शकलो तर...कसे वाटेल ? गुगल स्ट्रीट सर्व्हिसने ही सेवा जगात अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिली. पण भारतात गुगलला ही परवानगी मिळाली नाही. पण गुगलला जे शक्य झाले नाही ते भारतातील एका कंपनीने करून दाखवले आहे. मलिक बंधूनी ही कीमया केली आहे. त्यांच्या या प्रोजेक्टचे नाव आहे वोनोबो. www.wonobo.com या संकेत स्थळावर गेल्यास आपल्याला ही संकल्पना लक्षात येईल.

सध्‍या या साईटवर १२ शहरांचे नकाशे आपल्याला पहावयास मिळणार आहेत. यात मुख्यत्वे मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरु, चेन्नई,हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, जयपूर, कोस्टल गोवा, कोलकाता आणि आग्रा या शहरांच्या नकाशांचा समावेश आहे. तसेच पुढील काही आठवड्यात इतर ४२ शहरांचा नकाशा साइटवर पाहता येणार आहे.या साइटवर डाव्या बाजूला शहराचा नकाशा असेल, तर उजव्या बाजूला शहराचा स्ट्रीट व्ह्यू असेल. आपल्या संगणकाच्या माऊसच्या मदतीने आपण या मॅप्सवर व्हर्च्युअल पध्दतीने फिरु शकणार आहोत. नकाशातील सर्व फोटो हे सहामहिन्यापेक्षा जास्त जुने नसतील याची काळजी कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. लवकरच वोनोबो आपला स्वत:चा मोबाईल ऍ़प ही मार्केट मध्ये लाँच करणार आहे.


वोनोबो ही कंपनी भारतीय पर्यटन मंळासोबत काम करत आहे त्यामुळे आपल्याला भारतातील पर्यटन स्थळे घरी बसल्या बसल्या व्हर्च्युअल 360 डिग्री मध्ये फिरता येणार आहेत. चला आशा करुया लवकरच आपल्याला आपले औरंगाबाद शहरही या वेबसाईटवर पहावयास मिळेल. कारण औरंगाबाद ही पर्यटन राजधानी म्हणुन घोषित झाली आहे.

source : facebook

=================================
All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments