Breaking News

रेणुकामाता मंदिर औरंगाबादची अधिकृत मराठी वेबसाईट सुरु

औरंगाबाद शहरातील श्री रेणुका मातेचे जागृत देवस्थान असलेल्या श्री रेणुका माता मंदिर, एन-९, जळगांव रोड या मंदिराची अधिकृत वेबसाईट सुरु करण्यात आलेली आहे. संपुर्ण मराठीमध्ये या वेबसाईटवर मंदिराची संपुर्ण माहिती उपलब्ध आहे. अत्यंत सुबक मांडणी असलेल्या या वेबसाईटवर मंदिराचे आकर्षक फोटो, व्हीडीओ, विश्वस्त मंडळ, देणगीदार या सर्वांची इत्यंभुत माहीती उपलब्ध आहे. 

मंदिराचा संपुर्ण पत्ता व मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचा पत्ता पुढीलप्रमाणे :
www.renukamatamandir.com

नवराञ उत्सवात या मंदिरात भरगच्च्‍ा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मोठया संख्येने भाविक शहराच्या कानाकोपर्‍यातून या देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीच्या मंदिराचे बांधकाम सुबक व बारीक कलाकुसर केलेले आहे. मंदिराच्या बांधकामावरुनच याची भव्यता आल्या लक्षात येते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीची मनाला प्रसन्न करणारी मुर्ती आपल्याला दिसते. या मंदिराचा थोडक्यात इतिहास येथे दिलेला आहे. 

मंदिराचा संपुर्ण पत्ता व मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचा पत्ता पुढीलप्रमाणे :
www.renukamatamandir.com

मंदिराचा इतिहास

औरंगाबाद येथील एन-९, एल-सेक्टर, जळगाव रोड या परिसरात श्री रेणुका मातेच्या संचाराची/अस्तित्वाची जाणीव येथील काही रहिवाशांना साधारणपणे १९८३-८४ च्या सुमारास झाली आणि १९८४ च्या चैत्र शुद्ध पोर्णिमा शके १९०६ १५ एप्रिल १९८४ रक्ताश्री नाम संवत २०४० या दिवशी श्री रेणुका माता मंदिर अस्तित्वात आले. मंदिरातील श्री रेणुका मातेची मूर्ती गुरुवर्य परमपूज्य अण्णामहाराज यांनी स्वहस्ते तयार केले असून त्यांच्याच शुभ हस्ते कार्तिक शुद्ध पोर्णिमा शके १९११ वार शनीवार दिनांक ११ नोव्हेंबर १९८९ शुक्ल नाम संवत २०४६ या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. हे अत्यंत जागृक देवस्थान आहे श्री रेणुका मातेचे उपासना करताना अनेक भक्तांना याची प्रचाती आली आहे

मंदिराचा संपुर्ण पत्ता व मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचा पत्ता पुढीलप्रमाणे :
www.renukamatamandir.com

श्री रेणुका माता मंदिर 
एन-९, एल-सेक्टर, जळगाव रोड, 
हडको, औरंगाबाद ४३१००३ 
contact@renukamatamandir.com

=================================
All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments