Breaking News

फेसबुकवरील "होऊ दे खर्च" पेज तुफान लोकप्रियतेच्या शिखरावर...अल्पावधीतच 1 लाखाच्या वर लाईक्स


फेसबुक, वॉटस्अप, वुई चॅट, अँड्राईड, स्मार्टफोन आणि बरेच काही मागील दोन वर्षापासून टेक्नॉलाजीमध्ये झपाट्याने बदल झाले. आणि या सर्व बदलात आपण कधी स्वत:ला गोवुन घेतले ते कळले देखिल नाही. गुगल च्या अँड्राईड ऑपरेटींग सिस्टीमच्या आगमनानंतर तर काय मोबाईल कंपन्यांनी एकाहून एक असे सरस अँड्राईड ओ.एस असलेले मोबाईल बाजारात आणले. अँड्राईडच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. आजुन त्यात खंड पडलेला नाही त्या निघतच आहेत. आणि ही टेक्नॉलाजी सामान्य माणसापर्यंत कशी पोहचवता येईल याची जणू ओढच सर्व कंपन्यांना लागली आहे. असो हा विषय मी जास्त खेचत नाही हे झाले टेक्नॉलाजीचे.

आता या टेक्नॉलाजीने अगदी लहानापासून ते मोठयापर्यंत सर्वांना भुरळ घातली व अँड्रॉईड वरील विविध अँप्लीकेशन्स् नी चिञांचे, मॅसेजचे शेअरींग अगदी सोपे करुन टाकले. कधीकाळी एस.एम.एस चा जमाना होता तो आता वाटस् अप ने संपुष्टात आणला व मॅसेजिंग क्षेञात कमालीचा बदल घडवून आणला आता काय एखाद्या मिञाने पार्टी सेलिब्रेट केली, कुठे सहलीला तर आरे यार तुझे फोटो वाटस् अप कर ना यार ! हे त्याला म्हणायाला विसरत नाही. त्यामुळे अत्यंत सहज सुलभ झालेली इंटरनेटची प्रगती नवनवीन कल्पनांनाही जन्म देऊ लागली.

फेसबुकवरील विविध विषयांची पेजेस हे तरुन वर्गाचे आकर्षण व यातुनच अनेक गमतीदार, विनोदी, माहीतीपुर्ण पेजेसचा जन्म झाला जसे आईच्या गावात व बाराच्या भावात, आली लहर केला कहर, फेसबुक किडा, रजनिकांतचे जोक, मक्या रॉक्स इ. हे सर्व पेजेस आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेतच. पण यातच शब्दांची कोटी करुन फेमस झालेले पेजेसही आहेत. आणि यातच नंबर लागतो तो म्हणजे अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या "होऊ दे खर्च" या पेजचा. 

"होऊ दे खर्च" या पेजवरील संकल्पाना आज वॉटस् अप व फेसबुकवर धुमाकुळ घालत आहे. ही संकल्पना म्हणजे एका मिञाने दुसर्‍या मिञाला दिलेल्या शाब्दीक कोटीच्या शुभेच्छा ! शेअरींग करणार्‍या प्रत्येकाने मॅसेज दिला आहे की मिञा कितीही खर्च झाला तरी चालेले पण तु मोठा झाला याचा आम्हाला अभिमान आहे...या एका संकल्पनेवरुन या पेजवरील मेंबर्स दररोज काही ना काही अफलातून आयडीया लढवत आहेत व पेजवर पोस्ट करत आहे. यातील काही अफलातून विनोदी फाईल्स खाली देत आहोत. यात कोणी फॉरेन ला जात असेल, कोणी बॉडी बनवली असेल, कोणी लॉटरी जिंकली असेल, कोणी जिन्स पँट घेतली असेल, कोणी बुलेट घेतली असेल या सर्वांची मजा खेचण्यात एकाहुन एक सरस विनोदवीर येथे एकञ जमले आहेत. वाचा काही असेच विनोदी पोस्ट....

मिञांना देण्यात येणार्‍या या अनोख्या शुभेच्छांचे "होऊ दे खर्च" हे पेज अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले आणि बघता बघता या पेजला १ लाखाच्या वर लाईक्स मिळाल्या. मराठी व इंग्रजी दैनिकातून तसेच मराठी न्युज चैनेलवर पण या पेजची बातमी पोहचली हे विशेष. पेंटब्रश आणि फोटोशॉपच्या मदतीने आपल्याला यावरील पोस्ट बनविता येतात. फक्त आपल्या विनोदची शक्कल आपण लढवायाची आहे. मग बस्स्‍ा आपणही आपल्या मिञाची मज्जा घेऊ शकता. "होऊ दे खर्च" या कम्युनिटीची लोकप्रियता खाली ग्राफीक्सच्या माध्यतातून बघा...


"होऊ दे खर्च" या कम्युनिटीचा पत्ता आजच लाईक करा....."होऊ दे खर्च" खालील लिंक वर क्लीक करा

================================
All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments