Top Ad 728x90

Monday, November 25, 2013

Exclusive News : औरंगाबादच्या तरुणाने बनविली 10 बाय 10 इंचाची मोटारबाईक

औरंगाबादच्या तरुणाने बनविली 10 बाय 10 इंचाची मोटारबाईक


औरंगाबादेतील पीईएस इंजिनीअरींग कॉलेजमध्ये शिकणार्‍या शेख अफरोज या विद्यार्थ्याने एक कमालीची गोष्ट केली आहे. या पठ्ठयाने बनविली आहे चक्क 10 बाय 10 इंच आकाराची टु व्हीलर बाईक. या 10 बाय 10 इंच आकाराच्या बाईकचे वैशिष्टय म्हणजे 80 कीलो वजनाची व्यक्तीही सहज ही बाईक चालवु शकते आणि आपल्याला तीची घडी करुन पिशवीमध्येही ती घालुन नेता येते.  

शेख अफरोज हा पीईएस इंजिनियरींग कॉलेजमध्ये मेकॅनीकल इंजिनीयरींग शिकतो आहे. कॉलेजमधील शिक्षण पुर्ण करत असतांना त्यांने ही नवीन छोटी बाईक जन्माला घातली आहे. व आपल्या औरंगाबादचे नाव मोठे केले आहे.

आता या बाईकविषयी बोलायचे झाले तर या बाईकला मोठया बाईकप्रमाणे सर्व हो अगदी सर्व सुविधा आहेत. अगदी लाईटपासून, तर गाडीचे सिट, बॅटरी, पाय ठेवण्यासाठी जागा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इवलेशे स्टँड गाडी उभी करावयाला आणि हो गाडी स्टँड काढल्याशिवाय सुरु होत नाही. ही गाडी बटन स्टार्ट आहे आणि हीला डी.सी मोटार बसविण्यात आली आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ही बाईक पुर्णत: इको फ्रेंडली आहे. सोबत आपला स्मार्टफोन चार्ज करण्याची सोयही बाईमध्ये देण्यात आली आहे. अशा सुंदर वैशिष्टयांसह बनली आहे ही छोटी बाईक. 

गिनीज बुक व लिमका बुकात या बाईकची नाव नोंदणी करण्यासाठी अफरोज ने अर्ज दाखल केला आहे. तसेच पाण्यावर व सौरउर्जेवर चालणार्‍या बाईक चेही नवीन प्रोजक्ट तो तयार करत आहे. शेवटी आम्ही औरंगाबादकर ! जरा हटके ! असे म्हणावे लागेल.

फिरोजला औरंगाबाद ट्रॅव्हल्स परीवाराकडून आणि आमच्या सर्व वाचकांकडून त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

=================================
All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

0 comments:

Post a Comment

Top Ad 728x90