Breaking News

औरंगाबादेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता ''दामिनी'' या खास पोलिस पथकाची स्थापना


आज महिला सर्वच क्षेञात आघाडीवर आहेत तसेच नोकरी करणार्‍या महिलांची संख्‍याही दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या राञंदिवस काम ही करत आहे आणि अशातच अशा महिला व मुलींना सुरक्षिततेची जास्त गरज आहे. औरंगाबाद शहर हे औद्योगिक विकासाच्या उंबरठयावर असतांना या महिला व मुलींना सुरक्षितता देण्यासाठी औरंगाबाद पोलिसांतर्फे "दामिनी" या खास महिला फिरत्या पोलिस पथकाची स्थापना औरंगाबादेत करण्‍यात आली आहे.

बर्‍याच महिला या बाहेरगावी एकट्या प्रवास करतात, मुलींना कॉलेजला जावे लागते तेंव्हा त्या प्रत्येकीला घरी सुखरुप पोहचेपर्यंत मनात धास्ती आणि भीती असते तसेच शाळा, कॉलेज, टयुशन परीसरातही मुलींची छेडछाड करणारे टोळके उभे असतात. आता या सर्वांची चिंता करण्याची महिला व मुलींना मुळीच गरज नाही. अशांना धडा शिकविण्यासाठी व महिलांना खास सुरक्षितता देण्यासाठी दामिनी या पथकाची स्थापना करण्‍यात आली आहे. दामिनी पथकासाठी खास व्हॅन ही तयार करण्यात आली आहे या व्हॅनवर दामिनी महिला सुरक्षा पथक तसेच त्यांचा संपर्क क्रमांक नोंदविण्‍यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्या मनोरमा शर्मा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन पोलीस आयुक्तालयात बुधवार दि.8 जानेवारी 2014 रोजी सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, अरविंद चावरिया, डॉ. जय जाधव, गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त रामेश्‍वर थोरात, आíथक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह अनेक महिला आणि शाळा, कॉलेजच्या तरुणी यांची उपस्थिती होती. 

दामिनी पथक मदतीसाठी महत्वाचे दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत


दामिनी पथकात सहायक पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ, चार महिला पोलीस कर्मचारी आणि जीपचालक संगीता भाकरे यांचा समावेश आहे. नागरिकांनीही मदतीसाठी 9158042444 टोल फ्री 100, 1098,1091 अथवा 2240500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

निश्चितच हा एक स्थुत्य उपक्रम आहे...औरंगाबाद ट्रॅव्हल्स तर्फे या उपक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....आपल्या प्रतिक्रीया आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर कळवा.

=================================
All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments