Breaking News

"शालार्थ प्रणाली" लागु मराठवाडयातील सर्व शिक्षकांचे पगार आता होणार ऑनलाईन !


राज्यातील खाजगी आनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते आता शालार्थ या नवीन ऑनलाईन प्रणालीव्दारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे आता सर्व कर्मचारी व त्यांच्या वेतनाचा एक सामुहीक डेटाबेस बनण्यास मदत होणार आहे. Integrated Financial Management Service म्हणजेच एकीकृत वित्तीय प्रबंधन प्रणाली IFMS होय. यासाठी टाटा कन्सलटन्सी ची मदत घेण्यात आली आहे. शासनाच्या सेवार्थ या प्रणालीच्या यशानंतर शासनाने शालार्थ प्रणालीचा विकास केला आहे. आणि महाराष्ट्रातील 6 जिल्हयांमधे हीचा यशस्वी वापर देखील झाला त्यामुळे ही प्रणाली आता राज्यभर लागु करण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व शाळात संगणक आहेत व शासनाने याआधीच सर्व शिक्षकांना एम.एस.सी.आयटी कोर्स कंपलसरी केला आहे. येणार्‍या भविष्यातील ही Paper Less पध्दतीची नांदीच म्हणावी लागेल. यामुळे शासनाचे लाखो रुपये वाचणार आहेत तसेच वेळ, श्रम, पैसाही. मराठवाडयातील शिक्षकांचे वेतनही आता या शालार्थ प्रणालीने होणार आहे. या प्रणालीचे फायदे व महत्वपुर्ण लिंक आम्ही आपल्याला देत आहोत.

डिसेंबर पासून होणार ‘शालार्थ’ प्रणालीस सुरूवात
 • ‘शालार्थ’ प्रणालीच्या कामासाठी निवडण्यात आलेल्या शिक्षकांना १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान जिल्हा परिषदेत देण्यात येणार प्रशिक्षण
 • जिल्हय़ात खासगी अनुदानित प्राथमिकच्या ३९ शाळांमध्ये ३५६ शिक्षक कार्यरत
 • जिल्हय़ात खासगी अनुदानित माध्यमिकच्या ९२ शाळांमध्ये १२६0 शिक्षक कार्यरत
 • जिल्हय़ात जिल्हा परिषद प्राथमिकच्या ८३२ शाळांमध्ये ४ हजार ७६ शिक्षक कार्यरत
 • जिल्हय़ात जिल्हा परिषद माध्यमिकच्या १९ शाळांमध्ये ३२६ शिक्षक कार्यरत

शालार्थ प्रणालीचे होणारे फायदे 
 1. शालार्थ प्रणालीमुळे आता पेपर लेस काम होण्यास मदत होणार आहे.
 2. शिक्षकांचा पगार आता महिन्याचा १ तारखेलाच जमा होणार.
 3. सर्व राज्यभरातील शिक्षकांचा डेटा एकाच ठिकाणी जमा होणार.
 4. शिक्षकांचा हा डेटाबेस शासनाच्या व शिक्षकांच्याही मोठया कामात येणार.
 5. टेक्स्ट डेटाबेस सोबत शिक्षकांची सही आणि फोटोचाही डेटात समावेश
 6. माहितीची चाळणी करणे होणार अगदी सोपे.
 7. देयक निर्मिती, प्रस्तुतीकरण, लेखा परिक्षण, कर्मचारी वेतन या सर्व गोष्टी इलेक्ट्रानिक माध्यमातून होणार
 8. वित्तीय शिस्त निर्माण होण्यास मदत होणार
 9. वेतनाचा इतिहास अगदी सहजपणे उपलब्ध होणार
 10. वेतनाची लांबलचक चालणारी प्रक्रिया अचूक आणि आटोपशीर होण्यास मदत 
 11. कर्मचारी वेतन TREASURY NET व BEAMS(BUDGETESTIMATION, AUTHORIZATION & MONITORING SYSTEM) या वेतन प्रणाली मध्ये विनिमित होणार.

शालार्थ प्रणाली समजण्यासाठी आम्ही आपल्याला काही महत्वपुर्ण दुवे/लिंक खाली देत आहोत ज्याव्दारे आपणास ही प्रणाली समजण्यास मदत होणार आहे...

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवा...

=================================
All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments