Breaking News

औरंगाबादकरांनो "वाटस् अप" वापरा सांभाळून


आजकाल प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द आपल्याला ऐकायला मिळतो तो म्हणजे आरे तु वॉटस् अप केले का ? आणि हो स्मार्टफोन हातात आल्यावर व त्यांची संख्या वाढल्यानंतर वाटॅस् अप हा आपल्या पर्वणीचा शब्द झाला आहे. आजकाल प्रत्येकालाच काळाबरोबर अपडेट होण्याची संधी हे स्मार्टफोन देत आहे व लोक यांच्या प्रेमात पडत आहेत. पण नावाप्रमाणेच हे फोन स्मार्ट आहेत. 

जे लोक सारखे वॉटस् अप वापरतात त्याना सावधान करण्यात येत आहे. कारण अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारी जवळपास 200 सॉफ्टवेअर्स ही सायबर गुन्ह्यांना मदत करणारी आहेत.  यामध्ये वॉटस अप, वुई चॅट, True Caller, यांचा समावेश आहे. दिल्लीतील इन्फर्मेशन शेअरिंग अँड अनालिसीस सेंटरमधील कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने बाब समोर आणली आहे. यांनी 450 ऍ़पची विविध पातळयांवर चाचणी केली त्यात हा निष्कर्ष समोर आला आहे. त्यांच्या मते ही सर्व ऍ़प आपल्याकडून माहिती गोळा करत आहेत. आपल्या मोबाईलमध्ये येणारे मेसेज, आपल्या ठिकाणाची माहिती तसंच युनिक आयडी यासारख्या अनेक गोष्टी सर्व्हरवर नोंद करुन ठेवतं. या नोंदीमुळे आपली पर्सनल माहिती यांच्याकडे जाते व हेच धोकादायक आहे.

या ऍ़प्सवर कोणताही नियम नाही त्यामुळे हे ऍ़प्लीकेशन गुगल प्लेस्टोअर वर अगदी सहज उपलब्ध होतात व लोक यांच्या जाळयात अडकतात. वाटस् अपच नाही तर आणखी असे बरेच ऍ़प आहेत जे आपली माहिती गोळा करतात व त्यांच्या सर्व्हर वर अपलोड करतात. खालील काही ऍ़प्स पासून सावधान रहा.
  • मोबाइल सिक्युरिटी अँड अँटीव्हायरस
  • क्विक हिल मोबाइल सिक्युरिटी फ्री
  • कॉल ब्लॉकर
  • व्हॅल्युट हाइड-एसएमएस पिक्स अँड व्हिडीओ
  • नेक्स्ट लाँचर थ्रीडी शेल लाइट


=================================
All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments