Breaking News

औरंगाबाद मधील महत्वपुर्ण पर्यटन स्थळे !! काय काय पहाल औरंगाबादला आल्यावर !

पर्यटन राजधानी मधुन घोषित झालेले औरंगाबाद ही ऐतिहासिक नगरी आहे. औरंगाबादला ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि येथील संस्कृती सुध्दा त्याचप्रमाणे विकसित झाली आहे. औरंगाबादला आल्यानंतर आपण काय काय पाहु शकता याची एक थोडक्यात ओळख देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणे करुन आपल्याला येथील ऐतिहासिक वास्तुंची माहीती होण्यास मदत मिळेल.

बीबी का मकबरा
दख्खनचा ताजमहाल म्हणून बीबी का मकबर्‍याची ओळख आहे. युवराज आझम शाह याने बेगम राबिया दुर्राणी हिच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. याला चारही बाजुंनी उंच मनोरे असुन अष्टकोनी आकाराचा चबुतरा तयार करण्यात आलेला आहे. ताजमहालाची हुबेहुब प्रतिकृतीच येथे उभारण्यात आली आहे. मकबर्‍याच्या खालील भागत बेगम राबिया दुर्राणी हिचे थडगे आहे. खांबांना लाल रंगाचे खडे बसविण्यात आले आहेत. मकबर्‍याच्या समोर सुंदर बाग आहे, समोर कारंजी आणि जाळीदार फारसबंदी करण्यात आलेली आहे. दक्षिणेतील ताज म्हणुनच या वास्तुला संबोधले जाते. वास्तुकलेचा अप्रतिम नमुना म्हणुन याकडे बघितले जाते. तेंव्हा या वास्तुला आपण एकादा तरी भेट द्यायलाच हवी.

अजिंठा आणि वेरुळ लेणी
जागतीक वारसा स्थळांमध्ये युनिस्कोने अजिंठा आणि वेरुळ लेण्यांची नोंद केलेली आहे. ब्रिटीश सैनिकांनी या लेण्यांचा शोध लावला. आज देश विदेशातून असंख्य पर्यटक अजिंठा व वेरुळ लेणीला भेट देण्यास व येथील कलेचा अभ्यास करतात. वेरुळ लेणी औरंगाबाद पासून ३० कि.मी. अंतरावर आहे. बौध्द, हिंदु व जैन धर्मियांच्या लेण्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी एक मोठे अभ्यास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ज्यात लेण्यांचा जवळुन अभ्यास करण्यासाठी लेण्यांच्या हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. पावसाळयामध्ये अजिंठयातील वातावरण व निसर्ग पाहण्यासारखा असतो. अजिंठा व्हयु पॉइंट वरुन लेण्यांवर कोसळणारे धबधबे पाहण्याचा आनंद काही औरच. तर अजिंठा व वेरुळ लेणीला एकदा अवश्य भेट द्या.

दौलताबादचा किल्ला
औरंगाबाद पासून १३ कि.मी. अंतरावर आहे प्रसिध्द दौलताबाद किल्ला. १२ व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती झाली. अभेद्य असलेल्या दौलताबादच्या या किल्ल्याला सभोवती उंच तटबंदी आहे. यादवांच्या काळात याच किल्ल्याला देवगीरी असे संबोधले जायचे. नंतर महोम्मद तुघलकाच्या काळात याचे नामांतर दौलताबाद असे झाले दौलत-आबाद म्हणजे समृध्द शहर व परीसर होय. या किल्ल्यात भारतमाता मंदीर, चांद मीनार, चिनी महाल, पाण्याचा हौद अशी महत्वपुर्ण ठिकाणे आहेत. उंच डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी डोंगराच्या आतुन रस्ता व भुयारी मार्ग आहेत. पावसाळयात या किल्ल्यांला एक वेगळेच निसर्ग सौंदर्य प्राप्त होते.

नांदेड गुरुव्दारा
नांदेड शहराला संतांची भुमी म्हणुनही ओळखले जाते. नांदेड या शहराविषयी व येथी प्रसिध्द स्थळांविषयची महत्वपुर्ण माहिती लवकरच आपल्याला आमच्या वेबसाईटवर वाचावयास मिळले. नांदेड शहर प्रसिध्द आहे ते येथील गुरुव्दारामुळे शिखांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंदसिंगजी यांनी या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. औरंगाबाद शहरापासून २०० कि.मी अंतरावर नांदेड शहर वसलेले आहे.  गुरुव्दारातील स्वच्छता व टापटीप आपले लक्ष वेधुन घेते. तसेच येथील शांत व प्रसन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दुरदुरुन लोक नांदेड येथे येतात. नांदेड हे शहर पुणे, मुंबई अशा मोठया शहरांशी जोडलेले आहे.

औरंगाबादला आल्यानंतर काही अन्य महत्वपुर्ण प्रेक्षणिस स्थळे पहावयास विसरु नका ती खालीलप्रमाणे औरंगाबाद लेणी, पाणचक्की, अन्वा, चांगदेव मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, तापी व पुर्ण नदी, खुलताबाद, पैठण, भद्रा मारोती, गौताळा अभयारण्य, तोरणमाळ, औंढा नागनाथ.
=================================

All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments