Breaking News

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरुन आता "एअर कार्गो" ची सुविधा मिळणार

औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी..आता लवकरच चिकलठाणा विमानतळावर आपल्यालाल एअर कार्गो ची सुविधा मिळणार आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परीषदेने आपल्या मानांकन यादीत आता चिकलठाणा विमानतळाचा समावेश केला आहे. त्यामुळे आपले चिकलठाणा विमानतळ आता आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. एअर कार्गोचा फायदा मराठवाडयातील उद्योगांना व लहान मोठया व्यापार्‍यांना मिळणार आहे. तसेच एखाद्या व्यापार्‍याला आपला माल परदेशी पाठवायचा असेल तर तो थेट विदेशी व्यापारपेठेत चिकलठाणा विमानतळावरुन आता पाठवता येणार आहे. 

कस्टम विभागाचे कर्मचारी लवकरच येथे कार्यान्वित होणार आहेत. व एक मोठा कार्गो हब ही तयार होणार आहे जिथे परदेशी जाणारा माल व येणारा माल साठवता येईल. एअर कार्गोमुळे आता आंतरराष्ट्रीय दर्जाची फळे, भाजिपाला विमानाने पाठविणे व आणणे सोपे होणार आहे. एअर कार्गोमुळे औरंगाबाद शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे व आयात निर्यात सोपी होणार आहे. शेकर्‍यांनाही आपला भाजीपाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत थेट पाठविता येणार आहे. औरंगाबादेत रोडावलेली परदेशी पर्यटकांची संख्‍याही यामुळे वाढण्यास मदत होणार आहे. एअर कार्गोसाठी आता इतर शहरावर निर्भर राहण्याची वेळ औरंगाबादकरांना येणार नाही. औरंगाबाद शहरातील अशा ताज्या घडामोठी जाणून घेण्यासाठी आजच आमचे खाली दिलेले फेसबुक पेज लाईक करा....
=================================

All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK