Top Ad 728x90

Thursday, April 17, 2014

गुगल ने विकत घेतली टायटन ड्रोन कंपनी

गुगल ने विकत घेतली टायटन ड्रोन कंपनी


जगात इंटरनेट विश्वात सर्च इंजिनचा '"बाप" म्हणवल्या जाणार्‍या गुगल ने फेसबुक ला मागे टाकत टायटन एअरोस्पेस ही ड्रोन बनविणारी कंपनी विकत घेतली आहे. टायटन एअरोस्पेस ही कंपनी पायलट विरहीत ड्रोन म्हणजे लहान आकाराची विमाने तयार करते. अमेझॉन या शॉपिंग वेबसाईटनेही यापुर्वी या ड्रोनच्या मदतीने ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तु थेट हवाई मार्गाने ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचविण्याची सुविधा दिली होती. तसेच अमेरिकी सैन्य दलानेही अशा विमानांचा अतिरेक्यांचा मागोवा घेण्यासाठी उपयोग केला होता.
आता आपण विचारत पडला असाल की गुगल या ड्रोन चा काय वापर करणार ? तर गुगल या ड्रोनच्या मदतीने जो भाग आज इंटरनेट विश्वापासून अलिप्त आहे अथवा दुर्गम आहे अशा भागापर्यंत पोहचून इंटरनेट सुविधा प्रदान करणे. 


यापुर्वीही मोठया बलुन चा वापर करुन गुगलने दुर्गम भागापर्यंत इंटरनेट पोहचविले आहे. आता बलुन च्या सोबत ड्रोनचा वापर करुन गुगल इंटरनेट जास्तीत जास्त ठिकाणापर्यंत पोहचविणार आहे. याही पुढे जाऊन गुगलने या ड्रोनचा उपयोग आपले गुगल मॅप्स अधिक कसे अचूक करता येतील याही दृष्टीने प्रयत्न चालु केले आहेत. यासोबतच आपातकालीन मदत व हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासही याचा उपयोग होणार आहे.

हे ड्रोन सौर उर्जेवर चालतात व १ जीबी प्रतिसेकंद येवढया स्पीडने ते दुर्गम भागापर्यंत इंटरनेटही पोहचवू शकतात.

अशा आणि अनेक भरपूर टेक्नॉलाजी न्युज वाचण्यासाठी आमचे खालील फेसबुक पेज लाईक करा व आमचे अधिकृत फॅन बना....
=================================

All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

Top Ad 728x90