Breaking News

जगातील पहिला लोकल लँग्वेज असलेल्या अँड्रॉईड फोनची मुंबईतील तरुणांकडून निर्मिती


मुंबईतील तीन तरुणांनी एकञ येवुन अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीमवर चालणार्‍या व संपुर्ण लोकल लँग्वेज असणार्‍या फोनची निर्मिती केली आहे आणि त्याचे नाव ठेवले आहे फर्स्टटच. आज बाजारात हजारो अँड्रॉईड फोन उपलब्ध आहेत पण मग हा फोन या हजारो फोनपेक्षा वेगळा कसा ? याचं उत्तर आहे फर्स्टटच हा फोन काही सेकंदातच इंग्रजी भाषेचे मराठी व इतर अन्य भारतीय भाषांमध्ये रुपांतर करतो तसेच कोणत्याही भाषेतील मजकुराचा इंग्रजी भाषेत रुपांतर करण्यासही हा फोन मदत करतो. सहा हजार रुपये कींमत, ४ इंचाचा टच स्क्रीन व अँड्रॉईड 4.2 जेलीबीन या ऑपरेटींग सिस्टीमवर हा फोन चालतो. विशेष म्हणजे 48 अक्षरांचा व्हर्च्युअल कीबोर्ड हे या फोनचे वैशिष्ठ आहे. त्यामुळे भारतीय भाषातील मजकुर अत्यंत सोप्या व जलद गतीने टाईप होणार आहे. 

राकेश देशमुख, आकाश डोंगरे व सुधीर बांगरमबंदी अशी या फर्स्टटच मोबाईलची निर्मिती करणार्‍या तरुणांची नावे आहेत. 48 कीज असलेलल्या व्हर्च्युअल कीबोर्डचे आंतरराष्ट्रीय पेटंटही या तरुणांनी घेतले आहे. आता तुम्हाला इंग्रजीची भीती वाटण्याची गरज नाही अथवा तुम्हाला इतरांना इंग्रजीमध्ये मजकुर पाठविण्‍यास संकोच वाटण्याचीही गरज नाही कारण फर्स्टटच हा फोन तुमच्या भाषेला योग्य अशा इंग्रजी शब्दांसह रुपांतरीत करतो. 

फर्स्टटच हा फोन लवरच गुजरातमधील राजकोट मध्ये लाँच होणार आहे. पहिल्या लाँच ला या फोनमध्ये फक्त गुजराती भाषाच असणार आहे. पुढील टप्प्यात अन्य भारतीय भाषांचाही समावेश होणार आहे. लवकरच आपल्याला हा फोन मराठी व हिंदी भाषेसह मिळणार आहे. अधिक माहितीसाठी या मोबाईलच्या ऑफीशियल वेबसाईटला व्हिजीट करा...


फर्स्टटच फोनची टेक्नीकल माहिती पुढीलप्रमाणे

Processor : 1.2 GHz Dual Core
OS : Android Jelly Bean 4.2.2
Display : 4.0" IPS WVGA Capacitive Touch Screen (480*800 pixels)
SIM : Dual SIM Card Dual Standby
HSDPA : 3G WCDMA 2100 MHz
Band Mode : GSM 900/1800MHz
Camera : 2MP Primary Camera with Flash 0.3 MP Front Camera
Memory : 512 MB RAM + 4GB ROM Expandable upto 32 GB
GPS : AGPS
Connectivity : Bluetooth, Wi-Fi, USB
Music : FM Radio, MP3, MP4 Video
Sensor : Light Sensor, Proximity Sensor & Gravity Sensor
Battery : 1300 mAh

=================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK