Breaking News

औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकील्ला अभेद्य, खा.चंद्रकांत खैरे सलग चौथ्यांदा विजयी !


औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या लढतीत शिवसेना - भजपा महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे हे सलग चौथ्यांदा लोकसभेवर निवडुन आले आणि औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकील्ला अभेद्य राहीला. खा. खैरे यांनी काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आघाडीचे उमेदवार नितीन पाटील यांचा १ लाख ६१ हजार 747 मतांनी परावभ केला. खा.खैरे यांना ५ लाख २० हजार ५५९ मते पडली तर नितीन पाटील यांना ३ लाख ५८ हजार ८१२ मते पडली. नरेंद्र मोदींचे औरंगाबादकरांवर असलेले आकर्षण व त्यात खा. खैरे यांनी शहरात लावलेली मोदींसोबतची होर्डींगज् ही या निवडणुकीत चर्चेचा विषय बनली होती.  खैरे यांच्या या विजयामुळे औरंगाबादमधील शिवसेनेचा बालेकील्ला अभेद्यच ठरला. 


तसेच जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे- पाटील यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांचा २ लाख ६ हजार ७९८ एवढय़ा मताधिक्याने पराभव करून चौथ्यांदा लोकसभेत प्रवेश मिळविला. रावसाहेब दानवे यांना ५ लाख ९१ हजार ४२८, तर औताडे यांना ३ लाख ८४ हजार ६३0 मते मिळाली. तिसर्‍या क्रमांकावर बसपाचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना २३ हजार ७१९ मते मिळाली. अशा प्रकारे औरंगाबाद व जालना वासियांचे मतदान शिवसेना व भाजपा च्या बाजुने झाले.

Offical Website of Chandrakant Khaire
http://www.chandrakantkhaire.com/

=================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK