Breaking News

अहो आर्श्चयम् ! मोझिला कंपनीचा स्मार्टफोन अवघ्या 1500 रुपयांना...


इंटरनेट ब्राउजर विश्वात मोझिला कंपनीचे फायरफॉक्स हे ब्राउजर लोकप्रिय आहे. आणि आता मोझिला या कंपनीने अँड्रॉईड प्रमाणे स्वत:हाची स्मार्टफोन ऑपरेटींग सिस्टीमही लाँच केली आहे. आणि हीच ओ.एस. असलेले मोबाईल फोन लवकरच भारतीय व इंडोनेशियन बाजारपेठेत दाखल होणार आहेत. या मोबाईल हॅण्डसेटची कींमत ऐकाल तर आपल्याला आर्श्चय वाटेल. या मोबाईलची कींमत आहे रु.1500 फक्त. हो हे अगदी खरे आहे. 

इंटरनेट स्पीड वाढल्यामुळे व स्मार्टफोन धारकांची संख्‍या वाढल्यामुळे मोझिला कंपनीला याचा भरपुर फायदा होणार आहे. मो‍झिलाचे फायफॉक्स हे इंटरनेट ब्राउजर वापरावयास जेवढे स्मुद आहे तशीच त्यांची ओ.एस. पण वापरण्यास सोप्पी असणार आहे. गुगल प्ले स्टोअर प्रमाणे मोझिला पण स्वत:चे प्लेस्टोअर तयार करणार आहे. या ओ.एस. मध्ये एच.टी.एम.एल. 5 स्टँडर्डचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे वेब प्रोग्रॉमिंगचे ज्ञान असणार्‍यांना या ओ.एस.साठी अँप बनविणे सोपे होणार आहे.  

मोझिला कंपनीने कमी किंमतीत चीप बनविणार्‍या स्प्रेडट्रम या कंपनीशी करार केला आहे. मोझिलाने आपले स्मार्टफोन मागील वर्षी 2013 मध्ये जुलै महिन्यात लाँच केले होते ते जगभरात 15 देशात उपलब्ध आहेत. तसेच आता मोझिलाने चार कंपन्यांशी सहकार्य करार केला आहे ज्यात झेडटीई कॉर्प, एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे. अवघ्या 1500 रुपयांत हॅण्डसेट देण्याचा कंपनीचा मानस आहे. तेंव्हा आता मोबाईल धारकांना नामी संधी चालुन येते आहे असे म्हणावयास हरकत नाही.


आपणही जर टेक सॅव्ही असाला तर आपल्या जवळील ताज्या डिजिटल जगतातील बातम्या आपण आम्हाला पाठवू शकता...ईमेल करा ctindia2009@gmail.com आणि विषय टाका for aurangabadnews आपल्या नावानीशी आपली बातमी प्रसिध्द केली जाईल...

=================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK