Breaking News

Search This Blog

अक्षयचा आगामी चिञपट ‘इट्स एंटरटेन्मेंट’ ८ ऑगस्टला रीलिज होणार...


अक्षयने ?, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्याने त्याच्या आगामी ‘इट्स एंटरटेन्मेंट’ या चित्रपटात म्हणे चक्क मुलीच्या आवाजात गाणं गायलं आहे. सांगा, आहे की नाही, नावीन्य! बरं, हे या चित्रपटातील पहिलं रीलिज होणारं गाणही आहे. ‘जॉनी जॉनी’ असे या गाण्याचे बोल आहेत. सचिन-जीगर या जोडीने हे गाणं कम्पोज केलं आहे. हे दोघं अक्षयसोबत पहिल्यांदाच काम करताहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक फरहाद-साजिद या चित्रपटामुळे खूपच उत्साहित आहेत. ‘आमचं गाणं खूपच हलक-फुलकं आणि जोश निर्माण करणारं आहे. या गाण्यात सगळे पार्टीच्या मूडमध्ये आहेत. गाण्याच्या ओळी अक्षयचा मूड आणि ड्रेसशी खूपच मिळत्या जुळत्या आहेत,’ असं या दोघांचं म्हणणं आहे. या चित्रपटात अक्षयसोबत तमन्ना भाटीया, मिथुन चकवर्ती, जॉनी लिव्हर, सोनू सूद आदी कलाकार आहेत. हा चित्रपट ८ ऑगस्टला रीलिज होणार आहे, त्यामुळे तेव्हाच कळेल, अक्षयने काय सूर लावले आहेत ते !


News Source : www.bandhantv.com
=================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments