Top Ad 728x90

Thursday, August 28, 2014

बँकांचे व्यवहार आता मोबाईलवरुन डायल करा *99#

बँकांचे व्यवहार आता मोबाईलवरुन डायल करा *99#


मिञांनो एक आनंदाची बातमी. आता आपण आपले बँकांचे दैनंदिन व्यवहार थेट मोबाईलवरुनही करु शकता. यासाठी आपल्याला प्रत्येक बँकांचे वेगवेगळे कस्टमर केअर नंबर लक्षात ठेवण्‍याचीही गरज नाही. फक्त आपल्या मोबाईलवरुन *99# हा MMID नंबर दाबायचा व बँकेचा व्यवहार करायचा. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशने आपल्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेसाठी आपल्याला मोबाईलमध्ये कोणताही अँप डाऊनलोड करण्याची गरज नाही फक्त *99# हा नंबर डायल करावयाचा आहे. GSM मोबाईलवरील USSD सर्व्हीसच्या माध्यमातुन ही सुविधा चालते. यासाठी इंटरनेट कनेक्शनची सुध्दा गरज नाही. या सुविधेसाठी आपल्याला कुठलेही अतिरीक्त पेमेंट करावे लागणार नाही फक्त मोबाईल कॉलसाठी जे पैसे द्यावे लागतात तेवढेच द्यावे लागतील. 

या सुविधेमार्फत व्यवहार करण्‍यासाठी प्रथम तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडुन घ्या व बँकेकडे MMID ची मागणी करा. नेट बँकींग सुविधेप्रमाणे मोबाईल बँकीगसाठी MPIN ची आवश्यकता असते हा पीन फक्त तुम्हालाच माहित असायला हवा. यामुळे तुमचे व्यवहार सुरक्षित होतात. MMID मिळाल्यावर आपण आपल्या बँकेतील शिल्लक रक्कम, दैनंदिन व्यवहार यांच्या नोंदी घेवु शकतो. तसेच दिवसाला 5 हजारापर्यंतचे व्यवहार ही करु शकतो. 

या सुविधेमध्ये सहभागी असणार्‍या बँकांची नावे HDFC, State Bank, ICICI, Bank of Baroda, Bank of India, Dena Bank, Kotak Mahindra Bank, IDBI, OBC, Panjab Nationl Bank, Union Bank, Vijaya Bank, United Bank इत्यादी...तर मिञांनो या सुविधेचा वापर करा व आपली बँकीग सुरक्षित करा.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

0 comments:

Post a Comment

Top Ad 728x90