Breaking News

आनंदाची बातमी आता आपल्या वॉटस् अप वर रिड रिसीप्ट हाईड करा !


वॉटस् अप ने काही दिवसांपुर्वीच एक नवीन शक्कल लढवली होती त्यात त्यांनी आपल्या अपग्रेड केलल्‍या वॉटस् ऍ़प व्हर्जन मध्ये रीड रिसीप्ट हा एक नवीन पर्याय दिला होता. या सेवेमुळे समोरच्या व्यक्तीने आपला मॅसेज वाचला की नाही हे आपल्याला कळत होते.  यामुळे समोरची व्यक्ती खोटं बोलुच शकत नव्हती.  परंतु आता वॉटस् अप ने एक आशादायी निर्णय घेतला आहे व आपल्याला आता रिड रिसीप्ट हाईड करता येणार आहे.  यासाठी तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग्जमधून जाऊन 'रिड रिसीट' हा ऑप्शन डिसेबल करावा लागेल. फक्त हा ऑप्शन ऑफ केल्यावर युझर्सनी दुसऱ्यांचे मेसेज वाचले तरी चॅट बॉक्समध्ये ब्लू टिक दिसणार नाहीत. Settings > Privacy > Disable the ‘Read Receipts’ option हे ऑप्शन वॉटस् अपच्या लास्ट सीन सारखंच आहे. 

आता या सेवेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमचे वॉटस् ऍ़प अपग्रेड करावे लागणार आहे.  याचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला वॉटस् ऍ़पच्या वेबसाईटवर जावे लागेल ते फक्त त्यांच्या ऑफीशियल साईटवरच उपलब्ध आहे. आपल्यालाही असे टेक्नॉलाजी अपडेट माहीत असतील तर आम्हाला ctindia2009@gmail.com वर जरुर टाका आम्ही ते आपल्या नावानीशी प्रसिध्द करु...

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments