Breaking News

संडे स्पेशल डिश : रगडा कचोरी चाट बनवा आपल्या हाताने


रविवारी काहीतरी चमचमीत खावेशे वाटते तेंव्हा आम्ही तुमच्यासाठी ही खास डिश घेऊन आलो आहोत. आता आपला मोबाईल समोर ठेवा आणि बनवा रगडा कचोरी चाट. रगडा कचोरी चाट बनविण्यासाठी लागणारे साहितय खालीलप्रमाणे व्यवस्थित लिहा.

सारण तयार करण्यासाठी साहित्य : ५ कप पांढरे वाटाणे, १ चमचा तेल, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, २ चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चवीपुरते मीठ.

कव्हर तयार करण्यासाठी : सव्वा कप मैदा, २ चमचा गरम तूप किंवा तेल, अर्धा चमचा मीठ
आता इतर साहित्य : अर्धा कप चिंचगुळाची चटणी, पाव कप हिरवी तिखट चटणी, पाऊण कप दही, २ चमचे साखर, अर्धा चमचा मीठ, अर्धा कप बारीक शेव, कोथिंबीर, बारीक चिरुन, २ चमचे चाट मसाला, लाल तिखट आणि तळायला तेल.

कृती : वाटाणे राञभर भिजत ठेवावे यानंतर ते कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. शिजवलेले वटाणे डिशमध्ये काढून चांगले एकञ घुसळून घ्यावे व एकञ गोळा करावा.  एका मोठया भांडयात मैदा घ्या त्यात मीठ आणि गरम तूप घालुन मिक्स करावे. यानंतर यात पाणी टाकून हे मिश्रण चांगले मळून घ्यावे. व १५ मिनीटे बाजूला ठेवावे. यानंतर एकञ केलेल्या वटाण्याला मंद आचेवर वाफ द्यावी यासाठी कढईत तेल गरम करुन त्यात हळद, लाल तिखट, बडीशोप घालावी व हे मिश्रण ७ सेकंद परतून घ्यावे. धने व जिरेपूड त्यात टाकावी. भिजवलेल्या मैद्याचे ६ ते ८ समान भागात विभागणी करावी. त्यानंतर पुरीप्रमाणे पण थोडे जाडसर लाटावे व मध्यभागी वाटाण्याचे सारण ठेवावे. याला कचोरीप्रमाणे आकार द्या. आता कढईत तेल गरम करावे. व मंद आचेवर कचोरी तेलात चांगली तळून घ्यावी. आता सर्व कचोरी तळल्यानंतर कचोरी एका डिशमध्ये एकञ कराव्यात. व त्याच्या वरच्या बाजूला छोटे छिद्र पाडावे. यात चिंचेची चटणी, हिरवी चटणी, दही, चाट मसाला, बारीक शेव, लाल तिखट व कोथिंबीर टाकून सजवावे व लगेच गरम गरम सर्व्ह करावे. मिञांनो आपल्याला ही रेसीपी कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट मध्ये जरुन कळवा. भेटुया पुढच्या रविवारी एका नवीन डिशसह.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments