Top Ad 728x90

Sunday, November 16, 2014

आता लवकरच अॅण्ड्रॉईड चे नवीन व्हर्जन "लॉलीपॉप" येणार !

आता लवकरच अॅण्ड्रॉईड चे नवीन व्हर्जन "लॉलीपॉप" येणार !

मागील २ वर्षात स्मार्टफोन मध्ये प्रचंड बदल झाले आणि अजूनही ते सातत्याने  होत आहे. तसेच दिवसेंदिवस स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्याही वाढत आहे.  86% लोक अॅण्ड्राईड स्मार्टफोनला जास्त पसंती देतात. याच अॅण्ड्राईड ऑपरेटींग सिस्टीम चे नवीन व्हर्जन अॅण्ड्राईड लॉलीपॉप आता आपल्याला पुढे येणार्‍या स्मार्टफोन्स मध्ये दिसणार आहे. आतापर्यंत अॅण्ड्राईड ऑपरेटींग सिस्टिमचे फ्रायो, जिंजरब्रेड, हनीकोंब, सॅण्डवीच, जेलीबीन, किटकॅट असे व्हर्जन आपण पाहिले आणि या प्रत्येक व्हर्जनसोबत आपला मोबाईल अधिकच स्मार्ट झाला. गुगल मार्केटचा अभ्यास करुनच आपल्या ऑपरेटींग सिस्टम मध्ये नेहमी बदल करत असते. बदल करण्यामागचा कंपनीचा उद्येश हाच की सामान्य युझर ला अधिक सोप्या पध्दतीने हॅण्डसेट वापरता यावा. आता बघुया या नवीन येणार्‍या लॉलीपॉप मध्ये असे आहे तरी काय ?

डबल टॅप वेकअप सुविधा
आपला स्मार्टफोन ज्यावेळेस लॉक होतो त्यावेळेस तो पुन्हा चालु करण्यासाठी आपल्याला पावर बटन दाबावे लागते व फोन अनलॉक करावा लागतो. आता यातुन एक सोपा मार्ग नवीन ओ.एस. मध्ये आहे. स्क्रीनवर दोनदा टॅप केली की लॉलीपॉप ओ.एस. असलेला मोबाईल त्वरीत चालू होईल आहे की नाही मज्जा !

ओके गूगल
ओके गूगल हा प्रोग्राम लॉलीपॉप मध्ये अपडेट करण्यात आले आहे. आता तुम्ही तुमच्या मोबाईलला तोंडी आदेशाव्दारे फेसबुक, गाणे प्ले करणे, व्हीडीओ प्ले करणे अशा आज्ञाही देवू शकतात.

लॉक स्क्रीन नोटीफिकेशन
sms किंवा hangout चे उत्तर तुम्हाला फोन अनलॉक न करताही आता देता येऊ शकेल.  आणि येणारे मॅसेजही अनलॉक करता वाचता येतील.

अधिक सुरक्षा व्यवस्था
नवीन लॉलीपॉप मध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बरेच बदल करण्यात आलेले आहेत. या नवीन ओ.एस. मध्ये चोरीला गेलेल्या मोबाईल मधील डेटाचा कोणीही दुरउपयोग करु शकणार नाही अशी सुविधा देण्यात आली आहे. मालवेअर आणि इंटरनेटवरुन होणारे छुपे हल्ले रोखण्याची क्षमताही अधिक वाढविण्यात आली आहे. 


गेस्ट मोड
हा सर्वात भन्नाट फिचर आपल्याला लॉलीपॉप मध्ये दिसणार आहे. आपला मोबाईल मिञ नेहमीच मागत असतात व ज्यावेळेस त्यांच्या हातात मोबाईल पडतो त्यावेळेस ते त्यातील फाईल्स, पिक्चर्स बघतात यात तुमचे पर्सनल फोटो ही असू शकतात. परंतू आता या ञासातून तुम्हाला वाचता येईल. यासाठी गेस्ट मोड हा उत्तम पर्याय लॉलीपॉप मध्ये आहे. हा ऍ़क्टीवेट केल्यानंतर गेस्टला आपण काय पहावे याची परवानगी देवु शकतो. त्यामुळे तुमच्या पर्सनल डेटापर्यंत तो पोहचु शकत नाही. सध्या आपण असे करण्यासाठी वेगवेगळया लॉक्स चा उपयोग करतो व हे लॉक काही सुरक्षित नसतात. काही लॉक्स तर आपल्यालाल नको असलेल्या जाहिरातीही दाखवतात. आता यातून आपली सुटका होणार आहे. आता लॉलीपॉप ओ.एसच आपल्याला ही सुविधा देणार आहे. 

प्रायोरीटी मोड
हा नवीन मोड लॉलीपॉप मध्ये देण्यात आलेला आहे. या मोड व्दारे तुम्ही नको असलेले कॉल्स लॉक करतात येतात. कींवा तुम्हाला कोणत्या कॉलला कधी उत्तर द्यायचे कींवा टाळायचे याचे विविध ऑप्शन तुम्ही स्वत: ठरवू शकतात. 

आता मिञांनो तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करता आहातच तर थोडे थांबा या नवीन ओ.एस.चे मोबाईल तुम्हाला चांगले फायद्यात पडतील. डिसेंबर 2014 अथवा नवीन वर्ष 2015 पर्यंत ही ओ.एस. सर्वञ आपल्याला नवीन ओ.एस. असलेले मोबाईल दिसतील.

आपल्याल टेक्नॉलॉजी ची अशी माहिती आपल्या ई मेल वर पाहिजे असल्यास आजच आपला ईमेल बॉटम ला दिलेल्या बॉक्स मध्ये टाका व सबस्क्राईब व्हा. जशी आम्ही आमच्या साईटवर माहिती अपडेट करु त्याचा मेल थेट तुमच्या मेलबॉक्स मध्ये येईल.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

0 comments:

Post a Comment

Top Ad 728x90