Top Ad 728x90

Monday, November 17, 2014

,

औरंगाबादेतील विद्यापीठाची पुस्तके आता वाचा ऑनलाईन !

औरंगाबादेतील विद्यापीठाची पुस्तके आता वाचा ऑनलाईन !


औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एक हायटेक उपक्रम विद्यापीठात चालू केला आहे. या उपक्रमाचा फायदा संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना होणार आहे. विद्यापीठाने त्यांच्या ग्रंथालयात असलेली ३० लाख पुस्तके ई-पुस्तकांच्या स्वरुपात प्रकाशित केली आहे व ती ऑनलाईन ठेवली आहेत. याचा फायदा असा की आता आपल्याला अभ्यासासाठी ग्रंथालयात जाण्याची मुळीच गरज नाही.

ही पुस्तके तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही वाचु शकतात. १०० रुपयांमध्ये आपल्याला विद्यापीठाकडून एक युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल व हा एंटर केल्यानंतर आपल्याला या ऑनलाईन सुविधा वापरता येणार आहे. अशा प्रकारची ऑनलाईन लायब्रररी उपलब्ध करुन देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

विद्यापीठातील पुस्तकांच्या खजिन्यात ऐतिहासिक पुस्तके, पोथ्या, हस्तलिखित अशा अनेक दुर्मिळ ग्रंथांचा खजिना आहे.  विद्यापीठात ग्रंथालयाचे डिजिटल पध्दतीने मॅनेजमेंट करण्यात येते येथे सीडी आणि डिव्हीडींचा अभ्यास करण्यासाठी स्वतंञ डिजिटल यंञणा कार्यान्वित आहे. तसेच अद्ययावत इंटरनेट कॅफे, ई-बुक लायब्ररी अशा सुविधांमुळे येथील ग्रंथसंपदा उत्तम पध्दतीने सांभाळली जाते. आता या नवीन रिमोट ऍ़क्सेस सुविधेमुळे तर आपण घरबसल्या विद्यापीठातील ग्रंथसंपदेचा अभ्यास करु शकतो.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

0 comments:

Post a Comment

Top Ad 728x90