Breaking News

असा असावा हिवाळ्यातील आपला आहार


आता हिवाळा ऋतु सुरु झाला आहे. हिवाळा हा थंड हवामानाचा ऋतु आहे. यामुळे आपल्याला आपले शरीर हिवाळयात उष्ण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला आहारातही तसे बदल हिवाळ्यात करावे लागतात. शरीराचे संतुलन राखण्यासाठी उष्ण गुण असलेले पदार्थ आपण आहारात घेतले पाहिजे. हिवाळा या ऋतुमध्ये आपल्याला भुक जास्त लागते व पचनक्रियाही वाढते त्यामुळे आहारात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हिवाळयात दुध, तुप, लोणी अशा स्निग्ध पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारात केला पाहिजे. या पदार्थांमध्ये कॅलरीज चे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे हे पदार्थ आपल्याला शरीर उष्ण ठेवायला मदत करतात. 

जे लोक मांसाहार पसंत करतात त्यांनी हिवाळ्यात मटण, मांस, अंडी अशा पदार्थांचा समावेश करावा. आहारात तीळ, लसून, मिरी, लवंग, जीरे, आले, हिंग यांचा मसाला वापरावा. तसेच बदाम, काजू, मणुका, अक्रोड असा सुका मेवा आपण आपल्या आहारात हिवाळयात घेतला पाहिजे. बदाम, डिंक, काजु, यांचे लाडुही आता मार्केट मध्ये आपल्याला मिळतात. गहु, ज्वारी, बाजरी, अशा धान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. हिवाळयात आपण कोमट पाणी प्यावे त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. 

या दिवसामध्ये व्यायामालाही खुप महत्व आहे. तुम्हाला लवकर स्लीम व्हायचे असेल तर सकाळीच लवकर उठा आणि जॉगींग ला जा हिवाळ्यातील व्यायाम हा इतर ऋतुंपेक्षा जास्त फायदेशीर ठरतो. तसेच सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातुन मध घेतल्यास तो ही फायदेशीर ठरतो.

आपणही जर असे लेख लिहित असाला तर आम्हाला ctindia2009@gmail.com वर पाठवा आपल्या नावानीशी ते आम्ही प्रसिध्द करु व एकाच वेळेस ते फेसबुक, व्टीटर, अँड्राईड स्मार्टफोन आणि आमच्या वेबसाईटवर प्रसिध्द होतील.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments