Header Ads

Breaking News

ड्रायव्हिंग लायसन्स साठी आता ऑनलाईन नोंदणी आवश्यक


यापुढे ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना उपप्रादेशिक परिवहन  कार्यालयात ऑनलाईन परीक्षा देता येणार आहे. आता या नवीन सुविधेमुळे तुमचा परिवहन विभागात चकरा मारण्याचा ञास वाचणार आहे. तसेच तुम्हाला परीक्षेसाठी तुमच्या सोयीची तारीखही निवडता येणार आहे. याची अंमलबजावणी १ डिसेंबर 2014 पासून करण्यात येणार आहे. 

ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनाच परमनन्ट लायसन्सची परीक्षा देता येणार आहे.  सकाळी १0 ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १ व दुपारी १ ते २ अशा चार वेळेत परीक्षा देण्याचा पर्याय अर्जदारांना निवडता येईल. उमेदवारांचा श्रम, पैसा आणि वेळ वाचण्यासाठी राज्यभरात ऑनलाईन अपॉईन्टमेंटची सुविधा १ सप्टेंबर पासूनच आमलात आणण्यात आली आता या प्रयोग पुर्णत: यशस्वी झाल्यानंतर परमनन्ट लायसन्सच्या परीक्षेसाठीही हीच पध्दत लागू करण्याचा विचार परिवहन विभागाचा होता. आता सोमवारपासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. औरंगाबाद करांच्या सुविधेसाठी आम्ही या प्रक्रीयेतील महत्वाच्या लिंक तुमच्यासाठी देत आहोत. तुम्ही ऑनलाईन अथवा आपल्या स्मार्टफोनव्दारेही या लिंक व्हिजीट करु शकता आणि माहिती भरु शकता.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हला www.sarathi.nic.in या लिंकवर जावे लागेल तेथे तुम्हाला


अशा विविध लिंक दिसतील. योग्य तो पर्याय निवडून तुम्हाला तुमचा फॉर्म ऑनलाईन भरता येईल. व अपॉईन्टमेंटची तारीखही बुक करता येईल.

tags : driving license, aurangabad license, online license, online driving license form, driving license aurangabad, driving license maharashtra

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK