Breaking News

संडे स्पेशल : एकञ मिक्स केलेल्या डाळीचे वडे


मिश्र डाळीचे वडे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य : १ वाटी तुरडाळ, १ वाटी हरभर्‍याची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी मसुराची डाळ, मीठ, २ कांदे बारीक चिरून, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, हिंग

कृती पुढीलप्रमाणे :  प्रथम सर्व डाळी एकत्र भिजत घालाव्यात.  पुढे ३/४ तासांनंतर बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यांत मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग हळद घालून चांगले कालवावे. आता बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत. कांदा न खाणार्‍यांनी कांद्याऐवजी कोबी घालावा किंवा खूप कढीलिंब बारीक चिरुन घालावा. पालकचिरून ह्यात मिसळल्यासही चवही छान येते. गाजरे किसून निम्म्या डाळीत घालावी व निम्म्या डाळीत इतर काही तरी भाज्या घालाव्यात. या वडयांमुळे आपल्याला सर्व प्रकारची जीवनसत्वे मिळतात जी आपल्या शरीराला आवश्यक आहेत. चला तर मिञांनो या रविवारी वडे पार्टी करायला विसरु नका !

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments