Breaking News

गुलाबी थंडी, स्ट्रॉबेरीचे नानाविध प्रकार आणि हनीमून साठी प्रसिध्द महाबळेश्वर


महाबळेश्वर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासुन १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे.हे ठिकाण महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात आहे. 

महाराष्ट्र राज्यातील आणि देशविदेशातील पर्यटकांनी महाबळेश्वर सध्या गजबजून गेलं आहे. गोठलेले दवबिंदू, बोचणारी थंडी, लाल चिटूक स्ट्रॉबेरी आणि एवढं सगळं कमी म्हणून की काय सोबतीला घोडेस्वारी हा थाट आहे मिनी काश्मीर अशी ओखळ असलेल्या महाबळेश्वरचा. 

दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा मौसम चांगला आहे. त्यामुळं स्ट्रॉबेरीचंही उत्पन्न वाढलं आहे. पर्यटकांनी गर्दी केल्यानं स्ट्रॉबेरीची मागणीदेखील वाढली आहे. याचा फायदा स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे. अंगाला झोंबणारा गारवा, सोबतीला मक्याची गरमागरम कणसं, स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचे वेगवेगळे चवदार प्रकार यामुळं नवदाम्पत्यासाठी तर महाबळेश्वर म्हणजे एक मोठी पर्वणीच ठरत आहे. म्हणूनच परराज्यातील विवाहित जोडप्यांनी हनीमुनसाठी महाबळेश्वरला पसंती दिली आहे. येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.

येथे आल्यावर काय काय पहाल ?

विल्सन पॉईंट 
महाबळेश्वर मधील महत्वाचा व उंच पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट या पॉईंटवर तीन बुरुज आहेत.पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्‍याचा आसमंत दिसतो. दुसर्‍या बुरुजावर प्रातःकाली आलयास सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. तसेच पूर्वेला पाचगणी दिसते. तिसर्‍या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्ण नदीचे खोरे दिसते.

गहु गेरवा संशोधन केंद्र 
विल्सन पॉईंटच्या जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते. या रोगापासूप पिकाचे संरक्षण उपाय शोधले जातात. 

बॉम्बे पॉईंट 
जुन्या मुंबई रस्त्याजवळ हा पॉईंट असल्याने याला बॉम्बे पॉईंट हे नाव पडले. पर्यटकांच्या सर्वात आवडत्या पॉईंट पैकी हा एक पॉईंट आहे. अस्ताला जाणा-या सूर्याचे दर्शन हे या पॉईंटचे खास आकर्षण आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर या पॉईंट जवळ भरपूर गर्दी होते. क्गांच्या संख्येनुसार येथे सूर्य मावळताना त्याचा आकार लंबगोल, घागरीसारखा, चौकोनी, पतंगाकृती असा वेगवेगळा होत असतो. यालाच सनसेट पॉईंट म्हणतात.

हत्तीचा माथा 
याचे अंतर सहा कि.मी. एवढे आहे. पर्वत शिखरांचे हे पश्चिमेकडील सर्वात लांबचे टोक आहे. याची रुंदी ३.७ मीटर असून याची खोली खलच्या कोयना खोर्‍यापर्यंत सुमारे ८०० मीटर इतकी आहे. त्यामुळे या पॉईंटचा आकार हत्तीचा माथा आणि सोंडेसारखा दिसतो. हत्तीच्या माथ्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात. समोर प्रतापगड अगदी स्पष्ट दिसतो. तसेच जावलीच्या घनदाट अरण्यात लपलेले जावली गाव दिसते.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments