Breaking News

संडे स्पेशल : कुरकुरीत ब्रेड कचोरी खास औरंगाबादकरांसाठी


ब्रेड कचोरीसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे : स्लाईस ब्रेड, १ नारळ, १ १/२ कप साखर, ७-८ वेलदोडे, १/२ चमचा रोझ इसेन्स, थोडासा बेदाणा

कृती पुढीलप्रमाणे : नारळ खवून साखर घालून त्याचे सारण तयार करुन घ्यावे व साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. त्यात वेलची पूड, बेदाणा व रोझ इसेन्स घालून गार होऊ द्यावे.ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाकाव्यात. नंतर एकेक स्लाईस पाण्यात टाकून हाताने दाबून पाणी काढून टाकावे.नंतर वरील सारण १ चमचा घेवून ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून हाताने सर्व कडा जवळ आणून कचोरीसारखा गोल आकार द्यावा.अशा सर्व कचोर्‍या तयार करुन ताटात ठेवाव्यात व अगदी आयत्या वेळी तळाव्यात. फार सुंदर लागतात. 


कसा वाटला हा मेनु आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवा. आजच आमचा मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि सर्व न्युज मिळवा आपल्या खिशात !

tags : bread kachori, kachori, instant kachori, bread kachori mix, bread items
===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments