Breaking News

संडे स्पेशल : चमचमीत अंडा पराठे

साहित्य : २ वाट्या कणीक, मीठ, ४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा
सारणासाठी : ३-४ अंडी, १ कांदा, ४-५ हिरव्या मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा गरम मसाला, मीठ
करण्याची कृती : अंडी फोडुन घ्यावीत. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे. अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे. कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे. नंतर त्याच्या दोन पुर्‍या लाटून घ्याव्यात. एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी. कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments