Top Ad 728x90

Tuesday, March 24, 2015

,

औरंगाबाद महापालिकेसाठी 22 एप्रिलला मतदान

औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणूकीचा बिगूल वाजला असून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 22 एप्रिल 2015 रोजी औरंगाबाद महानगर पालिकेसाठी मतदान होणार आहे. आणि दिनांक 23 एप्रिल 2015 रोजी मतमोजली होणार आहे.


औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणूकीचा बिगूल वाजला असून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 22 एप्रिल 2015 रोजी औरंगाबाद महानगर पालिकेसाठी मतदान होणार आहे. आणि दिनांक 23 एप्रिल 2015 रोजी मतमोजली होणार आहे. दिनांक 23 एप्रिलच्या मध्यराञीपासून आचारसंहिता लागू होईल. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज केली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या 113 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या चुरसपुर्ण निवडणूकीकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे. 

सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 31 मार्च 2015 ते 7 एप्रिल 2015 पर्यंत उमेदवारी अर्ज दिले आणि स्वीकारले जातील. 8 एप्रिल 2015 रोजी अर्जांची छाननी, त्यानंतर लगेचच अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. 10 एप्रिल 2015 रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेता येतील. 11 एप्रिल 2015 रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्याचदिवशी निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. त्याचवेळी मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

मतदानाची तारीख व वेळ
22 एप्रिल 2015 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होईल. 23 एप्रिल 2015 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी सुरु होईल. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. 

महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम
01..निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक: 31 मार्च 2015
02..उमेदवारी अर्ज देणे आणि स्वीकारणे : 31 मार्च ते 7 एप्रिल 2015
03..उमेदवारी अर्जांची छाननी : 8 एप्रिल 2015
04..उमेदवारी अर्ज मागे घेणे : 10 एप्रिल 2015
05..निवडणूक चिन्हांचे वाटप : 11 एप्रिल 2015
6..मतदान दिनांक : 22 एप्रिल 2015
07..मतमोजणी दिनांक : 23 एप्रिल 2015


===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

0 comments:

Post a Comment

Top Ad 728x90